उघड्यावर मांस शिजविणार्‍या व्यवसायिकांवर कारवाई करावी महापालिका कायद्याची भीती उरली नाही : नगरसेवक आंधळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 2, 2021

उघड्यावर मांस शिजविणार्‍या व्यवसायिकांवर कारवाई करावी महापालिका कायद्याची भीती उरली नाही : नगरसेवक आंधळे

 उघड्यावर मांस शिजविणार्‍या व्यवसायिकांवर कारवाई करावी महापालिका कायद्याची भीती उरली नाही : नगरसेवक आंधळे

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महापालिका कायद्याची भीती नागरिकांमध्ये उरली नसल्यामुळे उघडपणे परवानगी नसतानाही व्यवसाय सुरू आहेत. गुलमोहोर रोड, पारिजात चौक परिसर हा रेसीडेन्शिअल परिसर आहे. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत आहे. तसेच पारिजात चौक परिसरामध्ये मोठी धार्मिक स्थळे असून उदा. गणेश मंदिर, विठ्ठल मंदिर, गजानन महाराजांचे मंदीर, स्वामी समर्थ महाराजांचे मंदीर आदींसह अनेक मंदिरे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पारिजात चौकात राजरोसपणे कुणाचीही परवानगी न घेता उघड्यावरती मांस शिजविण्याचे काम सुरु असल्यामुळे या भागातील नागरिकांना यामुळे होणार्‍या वासाच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांच्या भावनाही दुखावल्या जात आहेत. तसेच रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी मोठी गर्दी होते. परिजात चौकात हॉटेलांना कुठलीही परवानगी नसताना अनेक उद्योग या ठिकाणी राजरोसपणे सुरू आहे. एमएसर्ईबीने परवानगी नसणार्‍या ठिकाणी लाईटचे कनेक्शन दिले. हे सगळे कोणत्या आधारावर प्रशासनाने करुन देत आहे. या गोष्टीकडे महापालिका प्रशासन डोळेझाक करीत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. उघड्यावर शिजविणार्‍या मांसामुळे नागरिकांच्या
आरोग्यास धोका निर्माण होतो. मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिक या ठिकाणी व्यवसाय सुरू करीत आहे. त्यांची कुठलीही माहिती प्रशासनाकडे नाही. पत्र्याचे शेड उभारुन हॉटेल व व्यवसाय सुरु करण्यास महापालिकेने काय मुकगिरी परवानगी आहे काय? प्रशासनाने या गोष्टींकडे लक्ष देऊन तसेच नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक रामदास आंधळे यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here