भविष्यात मनसेची घौडदौड अशीच सुरु राहील- सुमित वर्मा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 11, 2021

भविष्यात मनसेची घौडदौड अशीच सुरु राहील- सुमित वर्मा

 मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त ‘धर्मजागृती अभियान’चा शुभारंभ

भविष्यात मनसेची घौडदौड अशीच सुरु राहील- सुमित वर्मा

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना ही मराठी माणसाच्या हक्कासाठीच झाली असून, मराठी माणसाला त्यांचे हक्क मिळवून देऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी मनसे लढा देत आहेत. आज युवकांचे, महिलांचे अनेक प्रश्न आहेत, यासाठी कार्यकर्ते काम करत असून, जेथे-जेथे अन्याय होतो, तेथे-तेथे मनसेने लक्ष घालून आपल्या वेगळ्या स्टाईलने प्रश्न सोडविले आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्यावतीने सुरु असलेल्या कार्याने प्रभावित होऊन अनेक युवक मनसेमध्ये दाखल होत आहेत. राज ठाकरे यांच्या धडाकेबाज नेतृत्वामुळे मनसे पक्ष सर्वसामान्यांना भावत आहेत. भविष्यात पक्षाची घौडदौड अशीच सुरु राहील, असे प्रतिपादन मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष  सुमित वर्मा यांनी केेले.
मनसेच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी सेनेच्यावतीने धर्मजागृती अभियान वर्गाच्या पोस्टर्सचे अनावरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले. नगरमध्ये वर्धापन दिनानिमित्त केक कापण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड, संकेत जरे, आदेश गायकवाड, ओंकार काळे, प्रणव सोनवणे, प्रशांत गारुडकर, चेतन आमले, स्वप्नील वाघ, योगेश गुंड आदि उपस्थित होते.
   पुढे बोलतांना सुमित वर्मा म्हणाले, मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त धर्मजागृती वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या अभियानांतर्गत पश्चिमात्य संस्कृतीचे होणारे अतिक्रमण थोपविण्यात यावे, युवा पिढी यापासून दूर रहावेत. लहान मुलांसाठी श्रीमद् भगवत गीता, श्लोक शिकविण्यात येणार आहेत. त्यामुळे मुलांना भारतीय संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न या निमित्त केले जाणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here