नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने नालेगाव अमरधामसाठी रक्षा अस्थी कलश कुंडची भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 4, 2021

नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने नालेगाव अमरधामसाठी रक्षा अस्थी कलश कुंडची भेट

 नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने नालेगाव अमरधामसाठी रक्षा अस्थी कलश कुंडची भेट


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः शहरातील नालेगाव येथील अमरधामसाठी नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने दोन रक्षा अस्थी कलश कुंड भेट देण्यात आले. तर या अस्थी कलश कुंडातील रक्षा देखील असोसिएशनच्या वतीने पैठण येथील गंगा-गोदावरी येथे विसर्जित केल्या जाणार आहेत.
   या रक्षा अस्थी कलश कुंडचा लोकार्पण नगरसेवक गणेश कवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अंतोन गायकवाड, महिला अध्यक्षा शारदा गायकवाड, शुभम सुडके आदी उपस्थित होते. नगरसेवक गणेश कवडे म्हणाले की, नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनने सामाजिक भावनेने राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. अंत्यविधीनंतर मनुष्याच्या रक्षा इतरत्र पडू न देता योग्य ठिकाणी विसर्जित होणार असल्याने होणारी विटंबना थांबणार आहे. अंतोन गायकवाड म्हणाले की, शहरातील अमरधाममध्ये बेवारस, गोर-गरीब व्यक्तीचा अंत्यविधी झाल्यानंतर त्यांच्या रक्षा अमरधाम येथील कचर्याच्या ठिकाणी व गटारीच्या परिसरात पसरुन विटंबना होत होती. या अस्थी रक्षा अमरधाममध्ये लावण्यात आलेल्या अस्थी कलश कुंडात संकलीत केल्या जाणार असल्याने होणारी विटंबना थांबणार आहे. तर संस्थेच्या वतीने त्याचे विसर्जन देखील पैठणला गंगा-गोदावरी येथे होणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here