सह्याद्री देवराई सामाजिक संस्था व धाडस समूहाने हाती घेतलेला उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ः भगत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 30, 2021

सह्याद्री देवराई सामाजिक संस्था व धाडस समूहाने हाती घेतलेला उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ः भगत

 सह्याद्री देवराई सामाजिक संस्था व धाडस समूहाने हाती घेतलेला उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ः भगत

शिवजयंतीनिमित्त बुर्‍हाणनगर येथे श्री अंबिका तुळजा भवानी देवी मंदिर परिसरात वृक्ष लागवड

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः शिवरायांचे आचार विचार अंगिकारावेत. मॉ जिजाउ व अनेक संत महात्मानी सांगितले की झाडे जगवा झाडे वाढवा प्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे यांचे सह्याद्री देवराई सामाजिक संस्था हे झाडे लावण्याचे काम करत आहे जीवनात झाडाचे अनन्यसाधारण महत्व आहे नागपूरवरून सायकल प्रवास करत हा धाडस ग्रुप आला असुन जे उपक्रम ते करत आहेत ते कौतुकास्पद आहे. ढोल ताशे न वाजवता सह्याद्री देवराई सामाजिक संस्था व धाडस समूहाने हाती घेतलेला उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी व समाजापयोगी आहे  झाडे लावणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन अ‍ॅड. अभिषेक भगत यांनी केले.
    शिवजयंतीनिमित्त बुर्‍हानगर येथे श्री अंबिका तुळजा भवानी देवी मंदिर परिसरात सिने अभिनेते सयाजी शिंदे सह्याद्री देवराई सामाजिक संस्था व धाडस समूह नागपूर आयोजीत  नागपूर ते रायगड सायकल प्रवास करण्याचे स्वागत कल्पतरू बहुउदेदशीय संस्थेच्या वतीने वृक्ष लागवड करून करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. अभिषेक भगत,अजय आजबे,अमोल जाधव,कृणाल भगत,अ‍ॅड. विजय भगत, पै. राजेंद्र भगत, संकेत भगत, चंदूशेठ सहाणी, सुरेंद्र भगत,वर्षा घाटोळे, रक्षा राहुलकर, प्रियंका वैद्य, धनश्री भोयर, निहारिका लांडगे, सुमित शरणागत, अविनाश कटरे, शुभम मुंडले, निशांत निदेंकर,अनिरुद्ध सोलाट , शरद आमगांवकर, राज मुन्ने आदी मान्यवर उपस्थित होते.
    धाडस ग्रुप हा साधारणत रोजचा 110 किलोमीटर सायकल प्रवास करत असून पाच मुली सात मुलं पूर्ण प्रवास 870 किलोमीटर 20 मार्च रोजी नागपूर येथील शिवतीर्थ गांधीगेट महाल येथून सुरुवात 31 मार्च छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी रायगड किल्ल्यावर पोचणार आहेत
    वर्षा घाटोळे म्हणाल्या की, शिवाजी महाराजांचे महिलाबाबतच्या धोरणाची या आजच्या काळात खरी गरज आहे या उपक्रमातर्गत स्त्री सशक्तीकरणाला प्रोत्साहन मिळेल धाडस समूहाच्या वतीने आयोजित नागपूर ते रायगड सायकल प्रवास हा प्रवास फक्त किलोमीटर पार करण्याचा नाही तर  शिवरायांच्या व मॉ जिजाऊंनी दिलेल्या संस्कार, विचार,आचार अंगिकारून कठीण परीक्षेत पास होण्याचा आहे  आजच्या युवा पिढीतील मुली मुलांमध्ये नवीन उर्जा व   बदल घडवण्यासाठी व त्यांना योग्य दिशा देण्याकरिता हा छोटासा प्रयत्न आहे.

No comments:

Post a Comment