ना. थोरांतांनी केली नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 6, 2021

ना. थोरांतांनी केली नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी.

 ना. थोरांतांनी केली नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी.

सरकार कोणाचेही असो वा नसो.. मुंबई पोलीस विश्वास पात्र!

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः हिरेन प्रकरणात तपास कोणाकडे कसा द्यायचा या संदर्भामध्ये गृह विभागाला अधिकार आहे. घटना का घडली, कशी घडली, यासंदर्भात त्या पद्धतीने त्यांनी तो तपास दिलेला आहे, मुंबई येथील व्यापारी हिरेन यांच्या संदर्भातील चौकशी  करतील, सध्या या घटनेचा एटीएस कडे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यानी दिली आहे, मुंबई पोलीस तपास करण्यामध्ये सक्षम आहे. सरकार कोणाचे असो वा नसो मुंबई पोलीस हे नेहमीच चांगल्या पद्धतीनेच काम करत असतात, त्यांच्यावर सगळ्यांनीच विश्वास ठेवला पाहिजे, या घटनेचा तपास योग्य पद्धतीने होईल असेमत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
नगर येथील नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते .यावेळी मंत्री शंकरराव गडाख, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, निवासी     उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन आदी या वेळी उपस्थित होते. श्री थोरात पुढे म्हणाले की, सरकार येत असते, जात असते मात्र मुंबईचे पोलीस तेच असतात त्यांची कार्यपद्धती अतिशय चांगली आहे, विरोधकांनी विरोध जरी केला असला तरी पोलिसांवर विश्वास सगळ्यांनी ठेवला पाहिजे. मुंबई येथील हिरेन व्यापार्‍यांच्या हत्येप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास एटीएस कडे दिलेला आहे तो तपास योग्य पद्धतीने होईल. नाशिक येथील स्टॅम्प घोटाळा संदर्भात विचारले असता, त्याची चौकशी सुरू आहे. काही बाबी त्यामधून आलेल्या आहेत निश्चितपणे कारवाई होईल असेही मंत्री थोरात यांनी यावेळी सांगितले.
     इमारतीचे काम थोडे फार काळ रेंगाळले आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र आता हे काम पूर्णत्वाला कशा पद्धतीने जाईल याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत. साधारणता 1 मे रोजी या वास्तूचे उद्घाटन झाले पाहिजे असे आमचा मानस आहे. या नियोजित वास्तू साठी 28 कोटी रुपयांची प्राशशकीय तरतूद केली होती, आता याचे काम पाहतात आता पन्नास कोटी रुपयांच्या पर्यंत तरतूद करण्यात आली आहे. ही वास्तू अतिशय सुंदर अशी होणार आहे व ती नगरच्य वैभवात भर घालणारी होईल, लवकरात लवकर काम पूर्णत्वाला कसे जाईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. - बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here