स्वयंसेवी संघटना होळीला करणार राष्ट्रीय चेतना गॅझेट प्रसिध्द - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 27, 2021

स्वयंसेवी संघटना होळीला करणार राष्ट्रीय चेतना गॅझेट प्रसिध्द

 स्वयंसेवी संघटना होळीला करणार राष्ट्रीय चेतना गॅझेट प्रसिध्द

समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे केले जाणार आवाहन

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने सोमवार दि.29 मार्च रोजी होळीचे औचित्य साधून हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रीय चेतना गॅझेट प्रसिद्ध करुन, उन्नतचेतनेने समाजाचा सर्वांगीन विकास साधण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
स्वतंत्र्याच्या 74 व्या वर्षात सुद्धा भारतातील 70 टक्के जनता उन्नतचेतनेच्या अभावाखाली वावरत आहे. पाच वर्षांसाठी निवडून द्या आणि सत्ताधार्यांचा तमाशा पहा, असा सर्रास कार्यक्रम महाराष्ट्रासह देशभर सुरु आहे. मागील वर्षी कोरोना संक्रमणाच्या हाहाकाराने अनेकांचे बळी गेले. तर अनेकांचा रोजगार हिरावला गेला. जानेवारी 2021 मध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर लग्नासारख्या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी करणे, मास्कचा वापर टाळणे, फिजीकल डिस्टन्ससह नियमांचे पालन न केल्याने कोरोना महामारीने पुन्हा आपले डोके वर काढले आहे. संपुर्ण राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना पुन्हा एकदा टाळेबंदी झाल्यास अर्थव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे. लोक सारासार विवेक सोडून वागल्याने कोरोनाचे संक्रमण वाढल्याचे संघटनांच्या वतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.  
   सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अनेक धनदांडग्या लोकप्रतिनिधीनी मतकोंबाड, जातीमंडूक प्रवृत्तीने मत खरेदी करुन निवडून आले. 70 टक्के नागरिकांमध्ये उन्नतचेतनेचा अभाव असल्याने ते अमिषाला बळी पडले. देशातील बेकारी, गरिबी, झोपडपट्टया, भ्रष्टाचार, दप्तर दिरंगाई, अनागोंदी, महिलांवरील अत्याचार, लोकप्रतिनिधींचा बेजबाबदारपणा याला उन्नतचेतनेचा अभाव कारणीभूत आहे. यामुळे देश हा प्रगती करु शकत नाही. समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी शिक्षणाबरोबर सुंस्कृत नागरिक घडणे अत्यावश्यक असून, हे उन्नतचेतने शिवय शक्य नाही. म्हणून संघटनांच्या वतीने उन्नतचेतनेचा विकास साधण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे म्हंटले आहे. यासाठी अ‍ॅड. गवळी, कॉ.बाबा आरगडे, ओम कदम, अशोक सब्बन, अंबिका नागुल, शाहीर कान्हू सुंबे, हिराबाई ग्यानप्पा, पोपट भोसले, अशोक भोसले, जालिंदर बोरुडे आदी प्रयत्नशील आहेत.

No comments:

Post a Comment