मुकूंदनगर मधील प्रलंबित प्रश्न मार्गी लागले ः आ.संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 23, 2021

मुकूंदनगर मधील प्रलंबित प्रश्न मार्गी लागले ः आ.संग्राम जगताप

 मुकूंदनगर मधील प्रलंबित प्रश्न मार्गी लागले ः आ.संग्राम जगताप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः  विकासात्मक दृष्टीकोन ठेऊन विविध कामे मार्गी लावल्याने स्वतंत्र उपनगर म्हणून मुकुंदनगरचा झपाट्याने विकास होत आहे. मुकुंदनगर भागातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहे. त्यामुळे  येत्या काळात मुकूंदनगर मधील विकासाला गती देण्याचे काम आपण स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातुन करणार आहे,  असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
   मुकूंदनगर येथील प्रभाग क्रमांक 3 ड्रिमलाईन सोसायटी येथे पेव्हिंग ब्लॉक कामाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्यावेळी आ.जगताप बोलत होते. यावेळी स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक खान समद हाजी वहाब, सामाजिक कार्यकर्ते बाबा खान, साहेबान जहागिरदार, अदिल शेख, तुफीया शेख, शेख शहारुक, शेख अक्रम, अकील सय्यद, विकास सय्यद, शेख जैनुद्दीन, शेख अकबर, शेख इरफान, हकीमजीवाला सैफुद्दील, शेख अस्लम, शेख सिराज, खान साबीर, सय्यद हारुन, सय्यद अब्दुल, मिर्झा अस्लम, शेख हारुन, मोहंमद हुसेन सर, शेख इसाक, शेख जावेद, शेख हमीद, सय्यद रिजवान आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना नगरसेवक समद खान म्हणाले, मुकूंदनगर या भागातील नागरिकांचे मुलभूत प्रश्न मार्गी लागावे. यासाठी अहमदनगर महानगरपालिका व आ. संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे या भागाच्या विकासकामासाठी मोठा निधी प्राप्त झाला आहे. यापुढील काळातही विकासकामे मार्गी लागणार आहे. प्रभाग क्र. 3 च्याविकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment