महापालिकेच्या खुल्या जागेचे सुशोभिकरण होणे गरजेचे : माजी नगरसेवक दीपक खैरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 16, 2021

महापालिकेच्या खुल्या जागेचे सुशोभिकरण होणे गरजेचे : माजी नगरसेवक दीपक खैरे

 महापालिकेच्या खुल्या जागेचे सुशोभिकरण होणे गरजेचे : माजी नगरसेवक दीपक खैरे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः प्रभाग क्र. 15 मधील महापालिकेच्या ओपन स्पेसचे सुशोभिकरण करण्याचे नियोजन केले असून भविष्य काळात लवकरच मार्गी लागतील. संजीवनी कॉलनी येथील ओपन स्पेसला कंपाउंड करुन सुशोभिकरण करणे, नगरसेविका विद्याताई खेरे यांच्या स्थानिक विकास निधीतून ही विकासकामे होणार आहेत. यामुळे परिसरातील लहान मुलांना खेळण्यासाठी मैदाने निर्माण होणार आहे. याचबरोबर वृक्षारोपण करुन परिसराला शोभा आणली जाईल. महापालिकेच्या खुल्या जागांचे सुशोभिकरण होणे भविष्यकाळात गरजेचे आहे. याचबरोबर प्रभागातील मुलभूत प्रशश्नापासून विकासाचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरू असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक दीपक खेरे यांनी व्यक्त केले.
   प्रभाग क्र. 15 च्या नगरसेविका विद्याताई खैरे यांच्या स्थानिक विकास निधीतून स्टेशनरोड येथील संजीवनी कॉलनीतील ओपन स्पेसचे सुशोभिकरणांचे उद्घाटन माजी नगरसेक दीपक खेरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी नगरसेवक अनिल शिंदे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव, चंद्रकांत शिपणकर, शांतीलाल गुगळे, श्रीकृष्ण लांडगे, भालचंद्र जोशी, अभय ललवाणी, दुर्गाताई कावळे, सुनंदा बळे, शोभा राशीनकर, प्रकाश मते आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रकात शिपणकर म्हणाले की, संजीवनी कॉलनीमध्ये महापालिकेचा मोठा ओपन स्पेस आहे. या ओपन स्पेसचे सुशोभिकरण होणे गरजेचे होते. नगरसेविका विद्याताई खैरे यांच्या माध्यमातून हे काम मार्गी लागल्यामुळे परिसराला शोभा येणार आहे. या परिसराचा विकास केल्याबद्दल परिसरातील नागरिक त्यांचे आभार मानतो.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here