“विधिसंघर्ष बालके व बालन्याय कायदा” पुस्तकांचे प्रकाशन व कार्यशाळा संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 27, 2021

“विधिसंघर्ष बालके व बालन्याय कायदा” पुस्तकांचे प्रकाशन व कार्यशाळा संपन्न

 “विधिसंघर्ष बालके व बालन्याय कायदा” पुस्तकांचे प्रकाशन व कार्यशाळा संपन्न

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जिल्हा बाल न्याय मंडळाच्या सदस्या प्रज्ञा हेन्द्रे-जोशी यांनी लिहिलेल्या ’विधिसंघर्षग्रस्त बालके आणि बाल न्याय कायदा’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्यासमवेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल, उपअधीक्षक (गृह शाखा) प्रांजल सोनावणे यांनीही या प्रकाशन सोहळ्यात भाग घेतला. अल्पवयीन मुलांकडून घडणार्‍या गुन्ह्यांच्या संदर्भात नेमक्या कायदेशीर तरतुदी काय आहेत, अल्पवयीन मुलांसाठी न्यायदान पद्धती कशा प्रकारची असते, याविषयी महत्वपूर्ण माहिती ड. प्रज्ञा हेन्द्रे जोशी यांच्या या पुस्तकातून मिळण्यास मदत होईल. बाल न्याय मंडळावर महिला बाल विकास विभागाकडून नियुक्त केले जाणारे समाजसेवक सदस्य, वकील, न्यायाधीश, बाल हक्कांसाठी काम करणारे कार्यकर्ते तसेच या विषयावर कुतूहल असणारे सर्वसामान्य नागरिक या सर्वांना या पुस्तकामुळे सोप्या शब्दात नेमके मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.  यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील बाल कल्याण पोलीस अधिकार्‍यांसाठी ’बाल न्याय कायदा व बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायद्याचे नियम’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. त्यात  प्रज्ञा हेन्द्रे- जोशी, बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनीफ शेख, सदस्या ड. बागेश्री जरंडीकर, बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, चाईल्डलाईनचे समन्वयक महेश सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here