एड्स जनजागृतीवर घेण्यात आलेल्या निबंध व पोस्टर स्पर्धेचे बक्षीस वितरण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 20, 2021

एड्स जनजागृतीवर घेण्यात आलेल्या निबंध व पोस्टर स्पर्धेचे बक्षीस वितरण

 एड्स जनजागृतीवर घेण्यात आलेल्या निबंध व पोस्टर स्पर्धेचे बक्षीस वितरण


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, जिल्हा रुग्णालय अहमदनगर, नेहरू युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने चास (ता. नगर) येथील श्री नृसिंह विद्यालयात एड्स जनजागृती पंधरवडा कार्यक्रमातंर्गत एड्स जनजागृतीवर घेण्यात आलेल्या निबंध व पोस्टर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. या स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.
    बक्षिस वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री नृसिंह विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत भवर, प्रा.रंगनाथ सुंबे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, एम.डी. साळुंके, के.एल. माने, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, बी.बी. शिंदे, डी.एम. मानकर, ए.एन. मुळे, के.ए. ठुबे, एस.के. अहिरे, व्ही.ए. पडवळ, बी.एस. वेताळ, आदम शेख, एस.आर. झिने, एम.एस. मुळे, संतोष एडके आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
   मुख्याध्यापक चंद्रकांत भवर म्हणाले की, एड्समुळे अनेक मृत्यूमुखी पडले आहेत. एड्सवर शंभर टक्के उपचार नसून, हा आजार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहे. यासाठी समाजात जागृती होणे अपेक्षित असल्याचे सांगितले. पै. नाना डोंगरे यांनी एड्स रोग टाळण्यासाठी जनजागृती व उपयायोजना हाच एकमेव पर्याय आहे. विवाहपूर्व युवक-युवतींनी एचआयव्ही तपासणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम- किर्ती कार्ले, द्वितीय- भक्ती काळे, तृतीय- तन्मय गावखरे, उत्तेजनार्थ- ओमकार रोकडे, पोस्टर स्पर्धा प्रथम- मिलिंद गायकवाड, द्वितीय- तन्मय गावखरे, तृतीय- ऋतूजा घुंगार्डे, उत्तेजनार्थ- भक्ती काळे यांनी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. तसेच स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. निबंध स्पर्धेचे परिक्षण प्रा.रंगनाथ सुंबे तर पोस्टर स्पर्धेचे परिक्षण उत्तम कांडेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, लेखापाल सिध्दार्थ चव्हाण, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.डी. साळुंके यांनी केले. आभार के.एल. माने यांनी केले.

No comments:

Post a Comment