सावित्रीच्या लेकींनी सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 11, 2021

सावित्रीच्या लेकींनी सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला

 सावित्रीच्या लेकींनी सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला

मा.आ.शिवाजी कर्डिले ः ‘फिनिक्स’च्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना सावित्रीबाई फुले स्मृतीगौरव पुरस्कार प्रदान

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः सावित्रीच्या लेकींनी सर्वच क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. कौटुंबीक जबाबदारी सांभाळून महिला समाजाच्या जडण-घडणीत महत्त्वाचे योगदान देत आहेत. मुलांवर संस्कार करुन समाज घडविण्याचे कार्य महिला करीत आहेत. विविध क्षेत्रात महिलांचे प्रमाणिकपणे सुरु असलेले कार्य प्रेरणादायी आहे. सावित्रीबाईंनी महिलांना स्त्री शिक्षणाचे दार उघडे करुन दिल्याने महिलांनी घरचा उंबरा ओलांडून राष्ट्रपती, पंतप्रधान पदापर्यंत जाऊन कर्तृत्व सिध्द केले. सावित्रीबाईंच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराने महिलांना काम करण्यास आनखी प्रेरणा व ऊर्जा मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक मा.आ. शिवाजी कर्डिले यांनी केले.
   फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त नागरदेवळे (ता. नगर) येथे युट्यूब स्टार सुमन धामणे, माधुरीताई कृष्णा जाधव, कार्यकारी अभियंता इंजी. सायली पाटील, प्रा. सिमा दिलीप गायकवाड, हिराताई वसंतराव बोरुडे, सामाजिक कार्यकर्त्या शारदा होशिंग, जागृती ओबेरॉय यांना सावित्रीबाई फुले स्मृतीगौरव पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आला. या पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी मा.आ. कर्डिले बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक अ‍ॅड. धनंजय जाधव, नगरसेविका पुष्पा बोरुडे, सुप्रिया जाधव, सरपंच सविता पानमळकर, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, प्रा.दिलीप गायकवाड, राम पानमळकर, रतन तुपविहीरे आदी उपस्थित होते.
   पुढे मा.आ. कर्डिले म्हणाले की, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांचे फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून  निस्वार्थ भावनेने सुरु असलेले कार्य कौतुकास्पद आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांचे गोर-गरीबांना रुग्णसेवा पुरविण्याचे कार्य सुरु आहे. अनेक दृष्टीदोष असलेल्यांना त्यांनी नवदृष्टी देण्याचे कार्य केले आहे. तसेच विविध क्षेत्रात सामाजिक भावनेने कार्य करणार्या महिलांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य त्यांनी केले असल्याचे सांगितले.  
   प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. जालिंदर बोरुडे म्हणाले की, समाजातील सर्व गरजू घटकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशन विविध मोफत आरोग्य शिबीर घेत आहे. फिनिक्सच्या वतीने सुरु असलेल्या नेत्रसेवेच्या चळवळीमुळे हजारो रुग्णांना नवदृष्टी देण्याचे जीवनात समाधान मिळत आहे. अनेक महिला विविध क्षेत्रात योगदान देत असून, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेविका पुष्पा बोरुडे यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद करुन मुलींना उच्च शिक्षित करण्याचे आवाहन केले. नगरसेविका सुप्रिया जाधव यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती देऊन महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र बोरुडे यांनी केले. आभार गौरव बोरुडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण कवडे, ओमकार वाघमारे, किशोर गांगर्डे, बाबासाहेब धीवर, सौरभ बोरुडे, ओम बोरुडे, सागर बनकर, प्रभाकर धाडगे, मोहनीराज कुर्हे, सुदाम वाबळे, अर्जुन कराळे, साई धाडगे आदींनी परिश्रम घेतले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता शासनाच्या नियमांचे पाळन करुन हा पुरस्कार सोहळा गावातील मंदिरात पार पडला.

No comments:

Post a Comment