समाजपरिवर्तनासाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे ः डोंगरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 9, 2021

समाजपरिवर्तनासाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे ः डोंगरे

 समाजपरिवर्तनासाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे ः डोंगरे

निमगाव वाघात कोरोना महामारीत योगदान देणार्‍या महिलांचा सन्मान

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः जागतिक महिला दिनानिमित्त निमगाव वाघा (ता.नगर) येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने कोरोना महामारीत योगदान देणार्या आरोग्य सेविका, अंगणवाडी कर्मचारी यांच्यासह महिला सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत महिला सदस्यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. तर कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी ग्रामस्थांना प्रतिबंधात्मकतेच्या उपाययोजनांची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.    
   या महिलांचा सन्मान सोहळा कार्यक्रमात निमगाव वाघा आरोग्य उपक्रेंद्राचे डॉ. शंतनू शिंदे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सचिन कळमकर, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, अनिल डोंगरे, भागचंद जाधव, डॉ. विजय जाधव, उद्योजक दिलावर शेख, आरोग्यसेवक निलेश हराळ, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, महेश वाघुले, अतुल फलके, डोंगरे संस्थेच्या सचिव मंदाताई डोंगरे, रंगनाथ शिंदे, पिंटू जाधव आदी उपस्थित होते.
   पै.नाना डोंगरे म्हणाले की, घराला घरपण व कुटुंबाला आधार देणारी ही एक स्त्रीच असते. कोरोना काळात मोठ्या धाडसाने महिला डॉक्टर, आरोग्यसेविका, परिचारिका व अंगणवाडी कर्मचारी यांनी महत्त्वाचे योगदान दिल्याने अनेकांचे जीव वाचविता आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here