डोंगरे भगिनींनी कुस्तीक्षेत्रात नांव उंचावले ः कचरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 27, 2021

डोंगरे भगिनींनी कुस्तीक्षेत्रात नांव उंचावले ः कचरे

 डोंगरे भगिनींनी कुस्तीक्षेत्रात नांव उंचावले ः कचरे

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्यावतीने कुस्तीपटू डोंगरे भगिनींचा गौरव

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणार्या राष्ट्रीय कुस्तीपटू तथा ज्युदो खेळाडू प्रियंका डोंगरे व प्रतिभा डोंगरे भगिनींचा अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने गौरव करण्यात आला. संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्रा.भाऊसाहेब कचरे यांच्या हस्ते डोंगरे भगिणींचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे सभासद पै.नाना डोंगरे  निमगाव वाघा ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार झाला. यावेळी माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक धोंडीबा राक्षे, माजी संचालक कल्याण ठोंबरे, सुभाष ढेपे, पोपट कोतकर, सोसायटीचे सचिव स्वप्निल इथापे, विष्णू भुजबळ आदी उपस्थित होते.
    प्रियंका डोंगरे व प्रतिभा डोंगरे यांनी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत नेत्रदिपक कामगिरी केल्याबद्दल त्यांचा प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रोख बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला. प्रा.भाऊसाहेब कचरे म्हणाले की, डोंगरे भगिणींनी कुस्ती क्षेत्रात आपले नांव उंचावले आहे. दरवर्षी कुस्ती व ज्युदोमध्ये प्राविण्य मिळवून त्यांचा सोसायटीच्या वतीने गौरव झाला असून, मुलींनी क्रिडा क्षेत्रात केलेली नेत्रदिपक कामगिरी प्रेरणादायी आहे. तसेच पै.नाना डोंगरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन त्यांना ग्रामपंचायतीच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने दरवर्षी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा होणारा सामुदायिक गुण गौरव कार्यक्रम रद्द करण्यात आला असून, प्रत्येक शाखेत गुणवंत विद्यार्थ्यांचे नियमांचे पालन करुन गौरव करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment