लॉकडाऊन काळातही लॉयर्स सोसायटीने ‘अ’ वर्ग कायम राखला ः अ‍ॅड. पादीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 30, 2021

लॉकडाऊन काळातही लॉयर्स सोसायटीने ‘अ’ वर्ग कायम राखला ः अ‍ॅड. पादीर

 लॉकडाऊन काळातही लॉयर्स सोसायटीने ‘अ’ वर्ग कायम राखला ः अ‍ॅड. पादीर

लॉयर्स को-ऑप सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन संपन्न
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर लॉयर्स को-ऑप सोसायटीची 2019 - 20 ची वार्षिक सर्वसाधारण सभा लॉयर्स सोसायटीचे चेअरमन अ‍ॅड.नानासाहेब पादीर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी व्हाईस चेअरमन अ‍ॅड. प्रभाकर शहाणे, सेक्रेटरी अ‍ॅड. रफिक बेग आदिंसह लॉयर्स सोसायटीचे संचालक व वकिल सभासदही ऑनलाइन सहभागी झाले होते. विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर होत साधक बाधक चर्चा होत खेळीमेळीत ही सभा संपन्न झाली.
   यावेळी बोलतांना चेअरमन अ‍ॅड. नानासाहेब पादीर म्हणाले, लॉयर्स सोसायटीचे सर्व सभासद वकिलांच्या सहकार्यामुळे उत्कृष्ट काम चालू आहे. गेल्या वर्षी आलेल्या करोना व्हायरसच्या संकटामुळे न्यायालयाचे कामकाज अद्याप पूर्ण क्षमतेने चालू नाहीये. याचा मोठा परिणाम लॉयर्स सोसायटीवर झाला असला तरी लॉकडाऊन काळातही लॉयर्स सोसायटीने चांगले काम करत ऑडीटचा ‘अ’ वर्ग कायम राखत चार कोटी हून अधिक रुपयांचा व्यवसाय केला आहे. येत्या वर्षात सभासदांना शेअर सर्टिफिकीट देण्याचा मानस आहे. यापुढील काळातही लॉयर्स सोसायटीच्या माध्यामातून सभासद वकिलांना जास्तीतजास्त चांगल्या सुविधा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
   यावेळी व्हाईस चेअरमन अ‍ॅड. प्रभाकर शहाणे, सेक्रेटरी अ‍ॅड. रफिक बेग, अ‍ॅड.अरविंद मुळे आदींनी सभासदांच्या शंकांचे समाधान केले. यावेळी संचालक अ‍ॅड. सुधीर टोकेकर, अ‍ॅड.बाळासाहेब गोफणे, अ‍ॅड.सुरेश कोहकडे, अ‍ॅड.रविंद्र शितोळे, अ‍ॅड. स्वाती नगरकर, अ‍ॅड.सविता कराळे, अ‍ॅड.सुरेश ठोकळ, अ‍ॅड.चंद्रकांत शेकडे, अ‍ॅड.मंगेश सोले, अ‍ॅड.शिवाजीराव अनभुले, अ‍ॅड.बी.एस.खांडरे, व्यवस्थापक अश्विनी पवार, एस.एल.दंडवते, एस.ए.घोलप, ए.ए.मुळे आदि कर्मचारी आदींसह सभासद  ऑनलाइन उपस्थित होते.

No comments:

Post a Comment