भाजपाच्या शहर महिला आघाडीच्या जंबो कार्यकारणीची घोषणा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 2, 2021

भाजपाच्या शहर महिला आघाडीच्या जंबो कार्यकारणीची घोषणा

 भाजपाच्या शहर महिला आघाडीच्या जंबो कार्यकारणीची घोषणा

पदाधिकारींमध्ये जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा मेळ

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा व शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली वल्लाकटी यांनी महिला आघाडीच्या नव्या कार्यकारणीची घोषणा केली आहे. नूतन कार्यकारणीत अंजली वल्लाकटी यांनी जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घातला आहे. नव्या कार्यकारणीत एक अध्यक्षा, 9 उपाध्याक्षा, 2 सरचिटणीस, 7 सचिव, 12 कार्यकारणी सदस्या व 14 विशेष निमंत्रित अशी जम्बो कार्यकारणीची घोषणा करण्यात आली आहे.
   यावेळी बोलतांना अध्यक्षा अंजली वल्लाकटी म्हणाल्या, राज्यात भाजपाची सत्ता असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना सक्षमपणे पायावर उभे करण्यासाठी विविध लाभदायी योजना सुरु करुन राबवल्या आहेत. आता भारतीय जनता पार्टी आज राज्यात सक्षम विरोधीपक्षाची भूमिका बजावत आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी जनांदोलन करत आहे. भाजपाची महिला आघाडी यात मागे नाहीये. महिलांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही भूमिका घेत आहे. महिलांवर अत्याचार करणार्‍या आघाडी सरकार मधील्या मंत्र्यांच्या विरोधात संपूर्ण राज्यात व शहरात आंदोलन करून मंत्र्यास राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या नेतृत्वाखाली आता शहर महिला आघाडीच्या नव्या कार्यकारणीची घोषणा करून शहरात महिलांची भक्कम फळी उभारली आहे. नव्या पादाधीकारींमध्ये नव्या जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळ घातला आहे. अध्यक्षा अंजली वल्लाकटी यांनी घोषित केलेली नवी कार्यकारणी पुढील प्रमाणे, उपाध्यक्षा - अमृता फुटणे, शुभांगी साठे, ज्योती दांडगे, सुजाता औटी, सविता कोटा, स्मिता शेलार, लीला अग्रवाल, ज्योती सैदाणे व सुनीता आडेप. संघटन सरचिटणीस - प्रिया जानवे. सरचिटणीस - सविता तागडे. सचिव - सुनीता सामल, सुरेखा खैरे, मीरा महाजनी, रुपाली मुथा, ज्योत्स्ना कुलकर्णी, सुजाता पाटील, हेमलता कांबळे.  कार्यकारणी सदस्या - विद्या दगडे, सुप्रिया देपोलकर, सुनंदा नागूल, स्वाती पवळे, शैलजा लड्डा, कावेरी वाघ, रत्नमाला कुलकर्णी, पूनम तरवडे, संगीता मुळे, अशा सातपुते, गंधाली पटवर्धन, आश्वनी साबळे, शीतल जाधव. विशेष निमंत्रित - प्रदेश सरचिटणीस सुरेखा विद्दे, गीता गिल्डा, वंदना पंडित, माजी उपमहापौर गीतांजली काळे, संगीता खरमाळे, कालिंदी केसकर, उपमहापौर मालन ढोणे, दीप्ती गांधी, सभापती लता शेळके, पल्लवी जाधव, सोनाली चितळे, अशा कराळे, सोनाबाई शिंदे व छाया राजपूत आदि उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, खा. सुजय विखे, माजी खा. दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे आदींनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here