विश्व मानवाधिकार परिषदेची शहर व जिल्हा कार्यकारिणी जाहीर
अहमदनगर - वंचित व दुर्बल घटकांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेल्या विश्व मानवाधिकार परिषदची शहर व जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक अध्यक्ष नवेद शेख यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विश्व मानवाधिकार परिषदचे प्रदेश सचिव सय्यद शफी बाबा, जिल्हा अध्यक्ष अज्जू शेख, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक अल्ताफ शेख, खालीद शेख, शोएब खान, तंजिम शेख, अकबर शेख, वाहिद शेख, शरीफ सय्यद, सरफराज खान, फरीद शेख, रहिम बिल्डर, शोएब शेख आदी उपस्थित होते.
यावेळी विश्व मानवाधिकार परिषदच्या शहराध्यक्षपदी चंद्रकांत उजागरे, युवक जिल्हा अध्यक्ष शहजाद खान, उपजिल्हाध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा प्रभारी इम्रान सय्यद, अल्पसंख्यांक जिल्हा महासचिव शादाब कुरेशी, जिल्हा महासचिव शब्बीर शेख, जिल्हा सचिव मुजम्मिल पठाण, शहर जिल्हा उपाध्यक्ष ललित कांबळे यांची नियुक्ती करुन उपस्थित पदाधिकार्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक अध्यक्ष नवेद शेख म्हणाले की, विश्व मानव अधिकार परिषद वंचित व दुर्बल घटकांच्या न्याय हक्कासाठी कार्य करीत आहे. या कोरोना महामारीच्या काळात अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. गरजूंना मदत करण्यात जीवनाचे खरे समाधान आहे. दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबध्द राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहर व जिल्हा कार्यकारणीचे नुतन पदाधिकार्यांनी संघटनेच्या ध्येय धोरणानुसार कार्य करणार असल्याचे स्पष्ट केले. नूतन पदाधिकार्यांना संघटनेच्या पुढील सामाजिक कार्यासाठी यावेळी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment