प्रभागातील अनेक दिवसांपासून रखडलेली विकासकामे मार्गी लावणार- सुनीता कोतकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 18, 2021

प्रभागातील अनेक दिवसांपासून रखडलेली विकासकामे मार्गी लावणार- सुनीता कोतकर

 प्रभाग 16च्या नगरसेविका सुनीता कोतकर यांच्या प्रयत्नातून प्रलंबित प्रश्न मार्गी

प्रभागातील अनेक दिवसांपासून रखडलेली विकासकामे मार्गी लावणार- सुनीता कोतकर    

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः जसजसा निधी उपलब्ध होत आहे. त्यानुसार प्रभागातील विकासकामे करीत आहे. मागील अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामांना मी नुसती प्राधान्य देत नाही, तर ती मार्गी लावत आहे. या प्रभागात मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विविध कामे आहेत. ही कामे पूर्ण करावीत, यासाठी प्रभागातील जनता वारंवार माझ्याकडे पाठपुरावा करीत असून, प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार कामे मार्गी लावत आहोत, असे प्रतिपादन नगरसेविका सुनीता कोतकर यांनी केले.
   प्रभाग 16मधील ज्येष्ठ महिला पुष्पा ठुबे यांच्या हस्ते नेप्ती रोड ते पुणे महामार्गापर्यंत अंतर्गत ड्रेनेजलाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास गायत्री कांडेकर, सिंधू कांडेकर, लंकाबाई कोतकर, अनिता झेंडे, आशा इथापे, शिवाजी कांडेकर, संग्राम कोतकर, भारत कांडेकर, बापू भवर, माऊली पठारे, सोमनाथ मोढवे, किशोर शिंदे, भाऊसाहेब मोढवे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
पुष्पा ठुबे म्हणाल्या की, परिसरातील सर्व महिलांनी मिळून नगरसेविका सुनीता कोतकर यांच्याकडे अनेक दिवसांपासून प्रलंबित असणार्‍या नेप्ती रोड ते पुणे महामार्गापर्यंत अंतर्गत ड्रेनेजलाईन ची मागणी आम्ही केली होती. त्यांनीच हा प्रश्न मार्गी लावला. प्रभागाला सुनीता कोतकर यांच्यासारखे सक्षम नेतृत्व लाभले आहे. या प्रभागातील विकासकामांना त्यामुळे गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. गायत्री कांडेकर म्हणाल्या की, महत्त्वाच्या व प्रलंबित समस्यांचा आधी निपटारा होत आहे. प्रभागाच्या नगरसेविका सुनीता कोतकर या जनतेला नुसती आश्वासने न देता प्रत्येक प्रश्न जाणून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करतात. त्यामुळे या भागाचा लवकरच विकासाच्या माध्यमातून कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन बापू भवर यांनी केले, तर आभार भाऊसाहेब मोढवे मांनी मानले. कार्यक्रमास प्रभागातील नागरिक व महिला उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment