कत्तलखान्यावर नगर तालुका पोलिसांची कारवाई... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 30, 2021

कत्तलखान्यावर नगर तालुका पोलिसांची कारवाई...

 कत्तलखान्यावर नगर तालुका पोलिसांची कारवाई...

38 गायींची सुटका, गोशाळेत रवानगी.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील वाळकी येथे कत्तल करण्यासाठी आणलेल्या 11 लाख 28 हजार रुपये किमतीच्या 38 लहान मोठ्या गाई ताब्यात, एक 5 लाख रुपये किमतीची पीक अप टेम्पो जप्त, 1 आरोपी अटकेत, 3 आरोपीविरोधात गुन्हा दाखल,ताब्यात घेतलेल्या गाईंची माऊली कृपा गोशाळा येथे सुखरूप रवानगी केली. ही कारवाई  नगर तालुका पोलिसांनी केली आहे.
   वाळकी येथे तोसिफ शेख हा इसम गाई कत्तलीसाठी येणार असल्याची माहिती तालुका पो ठानेचे सपोनि राजेंद्र सानप याना मिळाली त्यानुसार वाळकी सापळा रचून 1 महिंद्रा पीक अप टेम्पो ताब्यात घेण्यात आला. त्यामध्ये गोवंश 06 जनावरे आढळून आलेने तोसिफ कडे अधिक चोकशी केली असता त्याने या गाई झेंडिगेट येथे कत्तल करण्याकरिता घेऊन जात असून वाळकी धोंडेवाडी रोडवर अखिल कुरेशी याचे शेतातून ही जनावरे आणली असल्याचे सांगितले. त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप, पीएसआय जारवाल, राऊत, हेकाँ अबनावे, पोना मरकड, पोकॉ भालसिंग, पोना खेडकर, चापोकॉ पालवे, तोरडमल आदिंच्या पथकाने छापा टाकला.
   शेताचे बाजूस झाडाझुडपात 20 गाई लपवून बांधल्याचा आढळून आल्या, मोसीन कुरेशी याचे वाळकी येथे प्लॉटवर दाटीवाटीने ठेवलेल्या 12 गाई आढळून आल्या या सर्व 38 गाई ताब्यात घेऊन माऊली कृपा गोशाळा येथे पाठवणेत आल्या आहेत व तोसिफ शेख,अखिल कुरेशी,मोसीन कुरेशी ( रा झेंडिगेट,अहमदनगर) यांचेवर गुन्हा दाखल करणेत आला आहे. 11 लाख 28 हजार किंमतीच्या गाई व 5 लाख किमतीचे पिकअप वाहन असे 16 लाख 28 हजार किमतीचा मुद्देमाल वाळकी (ता.नगर) येथून नगर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी सपोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार पथकातील पीएसआय धनराज जारवाल, रितेश राऊत, हेकाँ अबनावे, पोना मरकड, पोकॉ भालसिंग, पोना खेडकर,चाहेकॉ पालवे, तोरडमल आदिंनी ही कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here