शहरातील ओपन स्पेस विकसित करण्यास प्राधान्य- अविनाश घुले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 9, 2021

शहरातील ओपन स्पेस विकसित करण्यास प्राधान्य- अविनाश घुले

 अंकुश क्रिकेट क्लबच्यावतीने सत्कार

शहरातील ओपन स्पेस विकसित करण्यास प्राधान्य- अविनाश घुले

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः महानगरपालिकेच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासासाठी मोठे काम करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नगरमध्ये अनेक कामे प्रलंबित असून, ते पूर्ण करण्यास प्राधान्य राहिले. त्याचबरोबर शहरातील प्रत्येक भागातील ओपन स्पेस विकसित करुन नागरिकांना फिरणे, व्यायाम करणे, मुलांना खेळण्यासाठी उपयोग होईल. अंकुश क्रिकेट क्लबमधील वेगवेगळ्या क्षेत्रातील तरुण एकत्र येऊन खेळाबरोबर सामाजिक कार्यासही प्राधान्य देत आहेत. अशा ग्रुपच्या माध्यमातून चांगले काम करण्याचा प्रयत्न करु, असे प्रतिपादन नूतन सभापती अविनाश घुले यांनी केले.
   महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अविनाश घुले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा अंकुश क्रिकेट क्लबच्यावतीने अ‍ॅड.अरविंद काकाणी व अमोल शिंगी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी क्लबचे सदस्य व खेळाडू उपस्थित होते. याप्रसंगी अ‍ॅड.अरविंद काकाणी म्हणाले, अविनाश घुले यांनी आपल्या कार्याने वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले काम करुन वेगळा ठसा उमटविला आहे.

No comments:

Post a Comment