ग्राहक भांडारच्या वतीने नरेंद्र फिरोदिया व छायाताई फिरोदिया यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 2, 2021

ग्राहक भांडारच्या वतीने नरेंद्र फिरोदिया व छायाताई फिरोदिया यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान

 ग्राहक भांडारच्या वतीने नरेंद्र फिरोदिया व छायाताई फिरोदिया यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः  नगरच्या ग्राहक भांडारचे संचालक व उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांना नुकतेच ‘टाइम्स मेन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाहक व ज्येष्ठ संचालिका श्रीमती छायाताई फिरोदिया यांना सावित्रीबाई फातिमा पुरस्कार प्राप्त झाला. याबद्दल या दोघांचा ग्राहक भांडारच्या वतीने यथोचित सत्कार सत्कार करण्यात आला.
    यावेळी चेअरमन अतुल भंडारी, राजेंद्र चोपडा, अरविंद गुंदेचा, विक्रम फिरोदिया, विजयसिंग परदेशी, सुनंदाताई भालेराव, भांडारचे जनरल मॅनेजर विशाल तांबोळी, सुरेंद्र भंडारी, प्रशासनाधिकारी प्रकाश गांधी आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपन्न झालेल्या या कार्यक्रमात कोरोना नियमांचे पालन करण्यात आले.
   सत्कारास उत्तर देताना नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, आजचा हा सन्मान खर्या अर्थाने माझ्या घरचा सन्मान आहे. ग्राहक भांडारचे आमचे जुने ऋणानुबंध आहे. ही संस्था खूप जुनी आहे. या संस्थेचा संचालक म्हणून मी काम करीत आहे. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत आम्ही सर्वजण नियमितपणे सामाजिक भावनेतून काम करतो. समाजाच्या उन्नतीसाठी यापुढील काळातही प्रयत्नशील राहू, असे ते म्हणाले.
श्रीमती छायाताई फिरोदिया म्हणाल्या की, ग्राहक भांडार ही संस्था खर्या अर्थाने आमच्यासाठी खूपच उच्चस्थानी आहे. संस्थेकडून होणारा आजचा हा सत्कार आम्हाला आमच्यावरील जबाबदारीची जाणीव करून देतो. समाजामध्ये कार्यरत असताना मला मिळालेल्या सावित्रीबाई फातिमा पुरस्कारामुळे यापेक्षा अधिक चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते, असे सांगितले.
   चेअरमन अतुल भंडारी म्हणाले की, उद्योजक नरेंद्र फिरोदिया संचालक व श्रीमती छायाताई फिरोदिया ग्राहक भांडारच्या संचालिका आहेत. त्यांनी संस्थेसाठी भरीव कार्य केले आहे. या संस्थेवर अनेक मान्यवरांनी आतापर्यंत काम केले आहे. खर्या अर्थाने सर्वांच्या योगदानामुळे ही संस्था नावारूपास आलेली आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करीत आहोत. संस्था अशीच उत्तरोत्तर प्रगती साधत राहील, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here