उपमुख्यमंत्र्यांकडून भाविकांची फसवणूक ! भाजपाकडून निषेध. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 11, 2021

उपमुख्यमंत्र्यांकडून भाविकांची फसवणूक ! भाजपाकडून निषेध.

 भगवानगड, गहीनाथगड, नारायण गड विकासासाठी पोकळ घोषणा..

उपमुख्यमंत्र्यांकडून भाविकांची फसवणूक ! भाजपाकडून निषेध.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः अर्थ संकल्पीय अधिवेशनात अनिश्चित निधीची पोकळ घोषणा करत केवळ राजकीय फायद्यासाठी राष्टवादी कॉगेस पक्षाकडून अधिवेशनात  भगवानगड, गहीनाथगड, व नारायण गड आवश्यकतेनुसार निधीची तरतूद केली जाईल असे शब्द उच्चारले. भगवानगड, गहीनाथगड  व नारायण गड तीर्थक्षेत्र पर्यटन विकासासाठी निधीची रक्कम याचा खुलासा न केल्याने महाराषटातील जनतेचा तसेच भक्तांचा स्वाभिमान दुखावला गेला आहे, त्यामुळे  उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंढे यांनी  जाहीर माफी मागावी. अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी केली आहे.
श्री क्षेत्र भगवानगड, गहीनाथगड व नारायण गड धार्मिक तीर्थक्षेत्र आराखडा विकासासाठी अर्थसंकल्पिय अधिवेशनात पोकळ व राजकीय घोषणा करत भाविकांची फसवणूक करून भावना दुखावल्या बाबत अर्थमंत्री अजित पवार यांचा जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर जिल्हयातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र भगवानगड, गहीनाथगड व नारायण गड हे महाराष्ट मधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. संत भगवान बाबानी कीर्तन प्रवचन च्या माध्यमातून समाजातील अनिष्ट रूढी ,परंपरा बंद करत हुंडाबंदी पशुहत्या बंद केल्या, ऊस तोडणी कामगाराच्या मुलांसाठी शाळा ,वसतिगृह उभारून शिक्षणाचे महत्व पटवून दिले .वारकरी संप्रदाय मधील फिरता नारळी सप्ताह सुरु करून सुद्न्य व सुसंस्कृत अध्यात्मिक परंपरा निर्माण केली पूर्वीचे धोम्य गडाचे नामकरण करण्यासाठी व संत भगवानबाबा चे आशीर्वाद घेण्यासाठी संयुक्त महाराषटाचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी संत भगवानबाबांच्या कार्यची दखल घेत भगवानगडावर येऊन विकासाचा पाया  रोवला होता .यावर बहुजन समाजाचे नेते बबनराव ढाकणे ,लोकनेते गोपिनाथ मुंढे  तसेच विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी भगवानगड विकासात मोलाचे योगदान दिले आहे परंतु महाविकास आघाडी सरकारने तिन्ही धार्मिक तीर्थक्षेत्रांना भरीव निधी जाहीर केला नाही. असेही निवेदनात म्हंटले आहे.  
   यावेळी दिलीप भालसिंग ,तुषार पोटे ,ऍड युवराज पोटे ,धनंजय बडे ,संतोष लगड ,गणेश कराड ,अर्जुन ढाकणे ,सोमनाथ शिंदे ,आनंद लहामगे ,महेश आव्हाड ,डॉ हर्षल वारे ,रणजित बेळगे ,अर्जुन धायतड्क ,सतीश म्हसाळकर अमोल गवळी आदी उपथित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here