अरणगाव ते शेळके मळा रस्त्याचे भाग्य उजळले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 11, 2021

अरणगाव ते शेळके मळा रस्त्याचे भाग्य उजळले

 अरणगाव ते शेळके मळा रस्त्याचे भाग्य उजळले


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः जिल्हा परीषदेच्या डिपीटीसी मधून जिल्हा परीषद सदस्य संदेश कार्ले यांनी मंजुर केलेल्या आरणगाव वाळकी रोड वरील शेळके मळा रस्त्याचे भाग्य उजाळले असे प्रतिपादन बांधकाम विभागाचे सभापती काशीनाथ दाते यांनी केले .
   शेळके मळा हा अरणगाव वाळकी या मुख्य रस्त्यापासून दोन किमी अंतरावर आहे . हा रस्ता अतिशय खराब झाला होता . पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरून जाताना चांगली च कसरत करावी लागत होती येथील ग्रामस्थानी या रस्त्याबाबत कार्ले याच्याकड रस्ता मजबुती करण करण्याबाबत मागणी केली . या रस्त्याचे काम पुर्ण झाल्यावर लोकार्पन करू असे कार्ले यांनी सहा महिन्यापुर्वी  सांगीतले होते .आज या रस्त्याचे काम पुर्ण झाले . जिल्हा परीषदेचे बांधकाम विभागाचे सभापती काशीनाथ दाते यांच्या हस्ते नारळ फोडून लोकार्पण करण्यात आले . यावेळी पंचायत समिती सभापती प्रविण कोकाटे, उपसभापती , रविंद्र भापकर , जिल्हा परीषद सदस्य संदेश कार्ले, माच्छिंद्र झावरे,  सरपंच स्वातीताई गहिले,आनंदराव शेळके ,ज्ञानदेव शेळके, गंगाधर शिंदे, बबन शिंदे दत्ता ससाने, मोहन गहिले, सुरेश जाधव ,विकी कांबळे, बंडोपंत गहिले ,बबन मुदल ,दशरथ शेळक ,सुभाष पुंड उपस्थित होते.

No comments:

Post a Comment