नगरकरांनी स्वराज्य संकल्पक शहाजीराजांचे स्मरण ठेवावे-असिफखान दुलेखान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 20, 2021

नगरकरांनी स्वराज्य संकल्पक शहाजीराजांचे स्मरण ठेवावे-असिफखान दुलेखान

 नगरकरांनी स्वराज्य संकल्पक शहाजीराजांचे स्मरण ठेवावे-असिफखान दुलेखान

मराठा सेवा संघ व इतिहासप्रेमी मंडळाच्यावतीने शहाजीराजांची जयंती साजरी

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची प्रेरणा ही अहमदनगरची पवित्र भुमी आणि त्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले हे होते. जगभरातील इतिहासकार शिवरायांनी स्थापलेल्या स्वराज्याची बीजे शोधू लागल्यास ती अहमदनगरच्या निजामशाहीमधे सापडतात कारण शिवरायांचे वडिल, आजोबा यांची कारकिर्द अहमदनगरच्या भुमीत उर्जितावस्थेत आली होती. शहाजीराजांनी 1624 च्या भातोडीच्या लढाईत केलेला पराक्रम हा जगाच्या निदर्शनास आला. शहाजी राजांस त्यावेळी ’सरलष्कर’हा किताब दिला गेला होता. या पराक्रमी व्यक्तिमत्वाची अहमदनगरकरांनी स्वराज्य संकल्पक शहाजीराजांचे कायम स्मरण ठेवावे,असे प्रतिपादन इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष असिफखान दुलेखान यांनी केले.
   मराठा सेवा संघ, इतिहासप्रेमी मंडळ यांच्यावतीने स्वराज्य संकल्पक महाबली शहाजी राजे यांची जयंती आज शहरातील वस्तुसंग्रहालय येथे साजरी करण्यात आली. यावेळी उर्जिता फौंडेशनच्या संध्या मेढे यांच्या हस्ते शहाजीराजे आणि जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास येताना कोरोनाचे शासकिय नियम पाळण्याचे, मास्क, सॅनिटायझर वापरण्याचे कटाक्षाणे पाळण्यात आले होते.
    कार्यक्रमास रहेमत सुलतान फौंडेशनचे युनुसभाई तांबटकर, मराठा सेवा संघाचे इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, कामगार संघटना महासंघाचे कॉ. दत्ताभाऊ वडवणीकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. भैरवनाथ वाकळे, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे शहर जिल्हाध्यक्ष फिरोज चाँद शेख, स्मायलिंग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे यशवंत तोडमल, अशोक चिंधे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here