सबका साथ सबका विकास करू म्हणणारे केवळ अदानी-अंबानींसारख्या भांडवलदारांचाच विकास करीत आहेत
पिंपरी चिंचवड मनपाचे माजी नगरसेवक मारूती भापकरनगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सबका साथ सबका विकास करू म्हणणारे देशातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्य माणसाला वा-यावर सोडून केवळ आणि केवळ अदानी-अंबानी सारख्या भांडवलदारांचाच विकास करीत आहेत. शेतकर्यांच्या शेतमालाला किमान हमीभाव मिळालाच पाहिजे. हि मागणी ते का मान्य करत नाहीत असा सवाल त्यांनी यावेळी केला. शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य माणसाची एकजूट हि अन्यायकारक सत्तेला नेहमीच दूर करत आलेली आहे. सिटू, माकपचे नेते आणि कामगार संघटना महासंघाचे कॉ.महेबूब सय्यद म्हणाले की जो पर्यंत कामगारविरोधी चार श्रम संहीता आणि खासगी वीज बिल विधेयक मागे घेतले जात नाही तो पर्यंत हा संघर्ष चालू राहणार आहे. देशभर व्यापक एकजूट सुरू आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते आणि पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक मारूती भापकर यांनी केले.
येथील जिल्हा शेतकरी कामगार संयुक्त संघर्ष समितीच्या वतीने दिल्लीच्या सीमेवर गेल्या चार महिन्यापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. परंतु फॅसिस्ट मोदी सरकार या आंदोलनाची कोणत्याही स्वरूपात दखल घ्यायला तयार नाही. या विरोधात अ. भा. समितीने देशव्यापी भारत बंदची हाक दिली होती. भाजप सोडून काँग्रेससह सर्व लोकशाहीवादी, डाव्या, पुरोगामी पक्ष आणि जनसंघटनांनी या भारत बंदला पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर आज दि.26 मार्च रोजी सकाळी 11:45 वाजता मार्केटयार्डजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शने आणि रास्ता रोको आयोजित करण्यात आला होता.
तसेच अ.भा.किसानसभेचे कॉ. विकास गेरंगे यांनी केंद्र सरकारने आणलेले तीन शेतकरीविरोधी काळे कायदे हे नोटबंदी आणि जीएसटीसारखेच फेल असुन देशातील शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य माणसाचा नाश करणारे आणि येत्या पिढ्या संकटात टाकणारे आहेत असे सांगितले. तसेच शेतकरीपुत्रांनी सत्य समजुन घेऊन शेतकरीहितासाठी लढले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महिला शेतकरी सिंधुताई त्रिंबके या म्हणाल्या कि मोदी सरकार हे फसवणुक करणारे सरकार आहे हे सर्व घटकांना आता समजुन आले आहे. जीएसटीची घाईगडबड करून व्यापारी बांधवांचीही या सरकारने फसवणुक करणे सोडले नाही. अशी फसवणुक करणारे कधीच आमचे पालक होऊ शकत नाहीत. त्यामुळे आम्ही या सरकारला माघारी बोलावत आहोत.
यावेळी कोतवाली पो.स्टे यांचा बंदोबस्त होता. आंदोलकांनी सुरूवातीला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भ्रष्टाचारविरोधी जनांदोलनाचे अशोक सब्बन, विकास गेरंगे, महेबुब सय्यद यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आणि बाबासाहेबांचा जयजयकार केला.
या आंदोलनात आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते, नेते तसेच अहमदनगर परिसरातील शेतकरी, कामगार, महिला, युवक, विद्यार्थी सामील झाले होते. आंदोलनात जैद शेख, गणेश आढाव, महादेव घोडेस्वार, राजेंद्र कर्डीले, रवी सातपुते, अश्विन शेळके, सूचिता शेळके, गंगाधर त्रिंबके, विडीकामगार नेत्या भारती न्यालपेल्ली, प्रकाश भराठे, शाहीर कान्हू सुंबे, ग्रामपंचायत कर्मचारी तसेत पतसंस्था कर्मचारी नेते अॅड.कॉ.सुधीर टोकेकर आदी सहभागी झाले होतो.आंदोलन यशस्वी करण्यासाठी अंबादास दौंड, भिल्ल समाज संघटनेचे सुनिल ठाकरे, क्रांतिसिंह कामगार संघटनेचे सतीश निमसे, दिपकराव शिरसाठ, एआयवायएफ शहरजिल्हाध्यक्ष फिरोज चाँद शेख, भिल्ल आदिवासी नेते चंद्रकांत माळी, संतोष गायकवाड, कामगार संघटना महासंघाचे रामदास वागस्कर, युथ फेडरेशनचे कार्तिक पासलकर, किसान सभेचे विजय केदारे, भाकपचे भैरवनाथ वाकळे आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment