दीनदुबळ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा : मुळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 13, 2021

दीनदुबळ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा : मुळे

 दीनदुबळ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा : मुळे

माजी मंत्री कै. अनिल राठोडांच्या जयंतीनिमित्त रिमांड होम येथे फळवाटप व बाबावाडीतील मुलांना मिष्ठान्नाचे भोजन

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः प्रभाग क्र. 15 चे नगरसेवक अनिल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव, दीपक खैरे, नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्यावतीने माजी मंत्री कै. अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त रिमांड होम येथे फळवाटप व बाबावाडीतील मुलांना मिष्ठान्नाचे भोजन देण्यात आले. समाजातील दीनदुबळ्यांची सेवा करणे ही ईश्वर सेवा मानली जाते. माजी मंत्री के. अनिल राठोड यांनी नगर शहरातील सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व करुन आपल्या कामाचा ठसा सर्वसामान्यांमध्ये उमटविला होता. नगर शहराला आपले कुटुंब मानून त्यांनी अहोरात्र काम करत होते. त्यांच्या कामाचा आदर्श आजच्या युवापिढीला प्रेरणादायी आहे. यापुढील काळात शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समाजातील प्रश्न सोडविण्याचे काम करावे. प्रत्येक घटकातील व्यक्तीला सोबत घेऊन समाजकारण केले. शहरामध्ये शिवसेनेचे ब्रीदवाक्य म्हणजे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करण्याचे काम केले. नगर शहराला कै. अनिल राठोड यांच्यासारखे संघर्षशील नेतृत्व मिळाले असल्यामुळे नगर शहर सुरक्षित राहण्याचे काम झाले. त्यांनी नेहमीच शिवसेनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहचविण्याचे काम केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक मधुसूदन मुळे यांनी केले.
   रिमांड होम येथे फळवाटप व बाबावाडीतील मुलांना मिष्ठान्ञाचे भोजन माजी मंत्री कै. अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्र. 15 चे नगरसेवक अनिल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव, दीपक खैरे, नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्यावतीने देण्यात आले. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक विक्रम राठोड, नगरसेवक दत्ता कावरे, माजी नगरसेवक संजय शेंडगे, अनिल लोखंडे, पारुनाथ ढोकळे, अशोक दहिफळे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अनिल शिंदे म्हणाले की, माजीमंत्री के. अनिल राठोड यांनी शिवसेना पक्षासाठी आपले बहुमोल असे योगदान दिले. त्यांनी आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते घडविले. त्यांची जयंती नगर शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रमाने साजरी केली जात आहे. प्रभाग क्र. 15 च्या वतीने आम्ही सर्व नगरसेवकांच्यावतीने रिमांड होम येथे फळ वाटप व बाबावाडीतील मुलांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. यापुढील काळातही त्यांचे विचार जागृत राहण्यासाठी आम्ही काम करू, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here