जनसंकल्प फौंडेशनच्यावतीने मुलींना पुस्तके वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 11, 2021

जनसंकल्प फौंडेशनच्यावतीने मुलींना पुस्तके वाटप

 जनसंकल्प फौंडेशनच्यावतीने मुलींना पुस्तके वाटप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः जनसंकल्प फौंडेशनच यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त मुलींना पुस्तके वाटप करून हा दिवस साजरा करण्यात आला. अहमदनगर शहरांमध्ये चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे स्माइलिंग अस्मिता चे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल, प्रहार युवाशक्ती जिल्हाध्यक्ष इंद्रजीत काळे व प्रहार युवाशक्ती जिल्हा उपाध्यक्ष महेश भोर उपस्थित होते.
   फौंडेशनच्यावतीने अहमदनगर शहर, रुईछत्तिशी, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीरामपूर, नेवासा या शहरात जागतिक महिला दिन मुलींना पुस्तके वाटून साजरा केला. मुळा एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल, गळनिंब येथे जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींचे पुस्तक देऊन सत्कार केला. तसेच जनसंकल्प फाउंडेशनचे पदाधिकारी पूजा गोरे, ऐश्वर्या झरेकर, महेश कांबळे, महेश परकाळे, अशोक माळशिखरे, प्रशांत रासकर, रामेश्वर गणगे, किशोर लोंढे, कल्पेश गोरे, सुरज मुसमाडे, निखिल मस्के, आकाश ढगे, तसेच सुचीता शिरसाठ, निकिता सावंत, वैष्णवी लवांडे, भरत मोहोळकर, आकाश शेटे आदी उपस्थित होते. नेवासा येथील कार्यक्रमास जनसंकल्प फाऊंडेशनचे नेवासा तालुका प्रमुख चि.रामेश्वर गणगे, शाळेचे मुख्याध्यापक बापूसाहेब काळे सर, व्ही.बी.आगळे, जे.आर शेटे, एस.एस.आखाडे, निलेश गणगे, संकेत गणगे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here