हिंदू धर्मरक्षक स्व.आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या जयंतीनिमित्त संतोष गेणप्पा यांच्या पुढाकारातून पांजरपोळ येथील गायीना चार्‍याचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 13, 2021

हिंदू धर्मरक्षक स्व.आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या जयंतीनिमित्त संतोष गेणप्पा यांच्या पुढाकारातून पांजरपोळ येथील गायीना चार्‍याचे वाटप

 हिंदू धर्मरक्षक स्व.आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या जयंतीनिमित्त संतोष गेणप्पा यांच्या पुढाकारातून पांजरपोळ येथील गायीना चार्‍याचे वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः स्व. आ. अनिल राठोड यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे.समाजाच्या भल्यासाठी नेहमीच राठोडांनी काम केले.गो सेवेला अनन्यसाधारण महत्व आहे.ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण देणे लागतो या उदात्त हेतूने संतोष गेनप्पा यांनी मुक्या प्राण्यांना दिलेला चारा हे कौतुकास्पद बाब आहे असे प्रतिपादन शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.
   हिंदू धर्मरक्षक स्व. आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या जयंतीनिमित्त संतोष गेणप्पा यांच्या पुढाकारातून पांजरपोळ येथील गायीना चार्‍याचे वाटप करण्यात आले  यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते ,माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर अभिषेक कळमकर,माजी उपमहापौर अनिल बोरूडे, गिरीश जाधव, योगिराज गाडे, गणेश कवडे, बाळासाहेब बोराटे,संतोष गेनप्पा, संजय शेंडगे,शाम नळकांडे,सचिन शिंदे, मदन आढाव, रमेश परतानी,अंबादास शिंदे, विशाल वालकर आदी मान्यवर उपस्थित होते.
   गेणप्पा म्हणाले की, राठोडाचा वारसा आम्ही समर्थपणे पुढे चालवत आहोत. सामान्य कार्यकर्ता मोठा होउ शकतो हे त्यांनी दाखवून दिला.अनिल राठोड यांच्या जयंतीचे औचित्य साधून पांजरपोळ येथील जनावरांना चारा देत आहोत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here