नवनागापूर नऊ तारखेपर्यंत बंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 30, 2021

नवनागापूर नऊ तारखेपर्यंत बंद

 नवनागापूर नऊ तारखेपर्यंत बंद

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरालगत असलेल्या नवनागापूर येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढल्यामुळे नगर तालुका प्रशासनाने दि. 9 एप्रिल पर्यंत नवनागापूर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
   दरम्यान नवनागापूर परिसर शहराजवळ असल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदार उमेश पाटील यांनी आदेश काढून दि. 9 एप्रिल अखेर रात्री 12 वाजेपर्यंत  नवनागापूर परिसर कॉन्टेन्टमेन्ट झोन म्हणून जाहीर केला आहे. यासंदर्भात आरोग्य विभाग तसेच पोलीस प्रशासनास आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत. गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गाव बंद करण्याचे आदेश ग्रामपंचायत प्रशासनानाला देण्यात आले आहे. अत्यवाश्यक सेवा म्हणून किराणादुकान , दूध, भाजीपाला सकाळी 8 ते 12 यावेळेत चालू राहतील. दवाखाने, मेडिकल दुकाने 24 तास चालू राहतील. कोरोना साथरोगाचा वाढता प्रादुर्भाव पहाता नियमांचे उल्लंघन करणारावर अतिशय कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा तालुका प्रशासनाने दिला आहे.
हा भाग होणार बंद
   कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर नवनागापूर परिसरातील साईनाथ नगर, आंधळे चौरे फेज, वडगावगुप्ता रोड, गजानन कॉलनी, मानोरमा कॉलनी, ज्ञानदीप शाळा, स्वाती कॉलनी, आंबेकर घर रस्ता,नगर मनमाड रोड, चेतना कॉलनी, डॉ. पगारे हॉस्पिटल, स्वामी विवेकानंद विद्यालय, तळेकर घर रस्ता, नवजीवन कॉलनी, दांगट मळा, सम्राट नगर, आंनद नगर हे कन्टेन्टमेन झोन तर नगर मनमाड रोड खंडोबा मंदिर, वक्रतुंड कॉलनी, अरुण हॉटेल हा परिसर बफर झोन घोषित करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment