काळे महिला महाविद्यालयाच्या गोडळकरची राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 11, 2021

काळे महिला महाविद्यालयाच्या गोडळकरची राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड

 काळे महिला महाविद्यालयाच्या गोडळकरची राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः रयत शिक्षण संस्थेचे, राधाबाई काळे महिला महाविद्यालयाची खेळाडू कु.वैष्णवी सुनील गोडळकर (एफ. वाय.बी. कॉम) हिने नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत विजय संपादन करून उत्तराखंड येथे होणार्‍या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
    जिल्हा क्रीडा संकुल, नांदेड येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 31 व्या वरिष्ठ गट राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत महाविद्यालयाच्या कु.वैष्णवी सुनील गोडळकर हिने तलवारबाजी (ईपी) या क्रीडास्पर्धेतील सांघिक गटात व वैयक्तिक मध्ये कांस्यपदक प्राप्त करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे. दि.19 ते 21 मार्च 2021 रोजी रुद्रपुर, उत्तराखंड येथे संपन्न होणार्‍या 31 व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी तीची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. या खेळाडूस शारीरिक शिक्षण संचालक प्रा.विलास एलके व प्रा.संजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाने क्रीडा क्षेत्रात उंच भरारी घेतलेली आहे. या विजयी खेळाडूंचे अभिनंदन महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन आमदार मा.आशुतोष काळे, सदस्य माजी आमदार अशोकराव काळे, सदस्या स्नेहलताई शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.विठ्ठल शिवणकर, प्रभारी प्राचार्य डॉ.माधव सरोदे, उपप्राचार्य प्रा.रामदास बर्वे, उपप्राचार्य प्रा.नासिर सय्यद आदींसह सर्व शिक्षकांनी खेळाडू विद्यार्थिनीचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment