वारुळाचा मारुती परिसरातील नागरिकांचे पाण्यावाचून हाल! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 23, 2021

वारुळाचा मारुती परिसरातील नागरिकांचे पाण्यावाचून हाल!

 पाईपलाईन वॉलमध्ये सिमेंट

नागरिकांनी दाद मागायची कोणाकडे?
वारुळाचा मारुती परिसरातील नागरिकांचे पाण्यावाचून हाल!

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः वारुळाचा मारुती तालिम येथील काही अज्ञात व्यक्तींनी पाईपलाईनच्या वॉलमध्ये सिमेंट टाकलेले आहे. त्यामुळे आम्हाला पाणी पुरवठा होत नाही. आम्ही सर्व ग्रामस्थ महानगरपलिकेचे कर, पाणीपट्टी तसेच इतर कर नियमितपणे भरतो तरीही आमची पिण्याच्या पाण्याची खुप मोठी गैरसोय होत आहे. पाणीपुरवठा करणारे कर्मचारी व अधिकारी यांना वारंवार तक्रार करुनही याकडे दुर्लक्ष केली असल्याची तक्रार केली. महानगरपालिकेत दि. 15 मार्च ला देण्यात आली आहे मात्र अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. मुठभर लोकांच्या आडमुठेपणामुळे समस्त नागरीकांना वेठीस धरणे योग्य नाही. गेल्या महिनाभरापासून या नागरीकांना पाणी पुरवठा होत नसल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.
   प्रशासकीय अधिकार्यांना फोन केला असता ते उलटी सुलटी उत्तरे देऊन वेळ मारुन नेतात तर काही अधिकारी फोनच उचलत नाहीत. अशा परिस्थितीत नागरीकांनी दाद मागायची तरी कोणाकडे असा प्रश्न नागरिकांनी तक्रारी द्वारे विचारला आहे. अहमदनगर महानगर पालिका नागरीकांकडून पाणी पट्टी, घर पट्टी सह अनेक कर लावते ते नागरीक भरतातही मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सेवा सुविधांचा लाभ होत नाही. महानगरपालिकेपेक्षा ग्रामपंचायत बरी अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
   वारुळाचा मारुती मंदिर परिसरातील तालमी जवळून पाण्याची लाईन पुढे गेलेली आहे. त्या ठिकाणच्या एका वॉल कायम चालु रहावा म्हणून व वॉलमेनने वॉल फिरवूच नये म्हणून अज्ञात व्यक्तीने वॉलमध्ये सिमेंट टाकले आहे. म्हणून पुढील नागरीकांना पाणी पुरवठा होत नाही. काही लोकांना भरपूर पाणी तर काही लोकांना पाण्याचा थेंबही मिळत नाही अशी परिस्थिती सध्या वारुळाचा मारुती मंदिर परिसरात पहायला मिळत आहे. पाणी पुरवठा विभागाला या सर्व गोष्टी ज्ञात असुनही सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत.

No comments:

Post a Comment