शिक्षकाने शोधून काढल्या अभ्यासाच्या सोप्या लोकप्रिय शिक्षणपद्धती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 18, 2021

शिक्षकाने शोधून काढल्या अभ्यासाच्या सोप्या लोकप्रिय शिक्षणपद्धती

 शिक्षकाने शोधून काढल्या अभ्यासाच्या सोप्या लोकप्रिय शिक्षणपद्धती

शिक्षण मंत्रालयाच्या ‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमात आकाशवाणीवरील मुलाखतीत डॉ.अमोल बागुल यांचा सहभाग

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः
भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या आयोजनातून इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर चौथ्या परीक्षा पे चर्चा या उपक्रमाच्या प्रचार-प्रसारासाठी येथील राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार विजेते डॉ.अमोल बागुल यांची अहमदनगर आकाशवाणीवर मुलाखतीसाठी निवड झाली असून या पार्श्वभूमीवर कर हर मैदान फतेह या ऑनलाइन व्याख्यानाचे देखील डॉ.बागूल यांनी आयोजन केले आहे.
    आकाशवाणी वरील निवेदनात व ऑनलाईन व्याख्यानांमध्ये डॉ.बागुल यांनी इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेसाठी सज्ज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आर क्यूब, सुपर थर्टी डे चॅलेंज, व ब्रेन टेन या तीन साध्या सोप्या अभ्यासाच्या जगावेगळ्या संकल्पना शोधून काढल्या असून देशभरातील असंख्य शिक्षक,पालक विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक 18 मार्च 2021 रोजी सायं.6 वा. ऑनलाइन व्याख्यानातून ऐकायला व त्यांचे नमुने/कार्यपद्धती पाहायला मिळणार आहेत.
    अभ्यास लक्षात ठेवण्याच्या साध्या सोप्या पद्धती, विविध सूत्रे /सराव, सुमारे तीस दिवसांमध्ये अभ्यासाचे योग्य व अचूक नियोजन, टापटीप पेपर लिहिण्याचा टिप्स,मानसिक ताणतणाव शून्य करण्यासाठीच्या उपाययोजना आदी विविध विषयांवर इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक यांच्याशी  डॉ.बागुल संवाद साधणार आहेत.
9595 54 5555 या व्हाट्सअप क्रमांकावर व्हाट्सअप, फेसबुक,ट्विटर, टेलिग्राम, टेलिग्राफ, लिंक डेन या समाज माध्यमांवरील ऑनलाईन वेबिनार च्या लिंक्स पाठवल्या जातील. तसेच याविषयी शिक्षक-पालक विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असल्यास आपण या क्रमांकावर वेबिनारपूर्वी व नंतर देखील संपर्क साधू शकता,असे आवाहन डॉ.बागूल यांनी केले आहे.
1)आकाशवाणीवरील व्याख्यान
अ)गुरुवार 18 मार्च स.10.40 ते 11.00
ब)शुक्रवार 19 मार्च 2021 सायं. 5.30 वा. आणि
क)शनिवार20 मार्च 2021 स. 8.40 वाजता रेडीओ टयून इन करा आकाशवाणी अहमदनगर केंद्र 100.1ाहू वर किंवा छएथड जछ खठ या मोबाईल अ‍ॅपवर 2)कर हर मैदान फतेह ऑनलाईन व्याख्यान गुरुवार दि 18 मार्च 2021 सायं.6 वा. 1)https://www.facebook.com/profile.php?id=100042834497711 2)https://www.facebook.com/profile.php?id==100003064418346  फेसबुक पेज च्यावरील लिंक वर क्लिक करून आपण लाईव्ह वेबिनार पाहू शकता.
काय आहे परीक्षा पे चर्चा उपक्रम?
    पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या झझउ 2021 या संकल्पनेत चौथ्या पर्वामध्ये देशभरातून सुमारे 12 लाखांपेक्षा जास्त शिक्षक-पालक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शिक्षक-पालक विद्यार्थ्यांच्या मनातील ताण कमी करण्यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी विद्यार्थ्यांना सुलभ मार्गदर्शन करीत असतात.यातील अनेक घटकांबरोबरच देशभरातील राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची या उपक्रमाच्या प्रचार प्रसार तसेच शिक्षण प्रेमींचा सहभाग वाढवण्यासाठी मदत घेतली जाते.परीक्षा पे चर्चा या उपक्रमाचा पहिला कार्यक्रम 16 फेब्रुवारी 2018 रोजी तालकटोरा स्टेडीयम येथे संपन्न झाला होता.
परीक्षा पे चर्चा 2021 या चौथ्या पर्वात शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली असून त्यामधील निवडक विजेत्यांना मा. पंतप्रधानांशी संवाद साधण्याची व बौद्धिक सत्रात ऑनलाईन सहभागी होण्याची नामी संधी उपलब्ध होणार असून विजेत्यांना मा.पंतप्रधान यांनी सही केलेली प्रतिमा तसेच विशेष परीक्षा किट देखील भेट देण्यात येणार आहे.या स्पर्धेतील सहभागाचे प्रमाणपत्र मंत्रालयाच्या वतीने डॉ.अमोल बागुल यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. मा.पंतप्रधान मोदीजी लिखित ’एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाचा पुढील भाग देखील या पर्वात प्रकाशन होऊन तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मंत्रालयाचा मानस आहे.एक्झाम वॉरियर्स यापुस्तकाच्या पहिल्या भागाचा मराठी अनुवाद डॉ. अमोल बागुल सध्या करीत आहेत.
   कोरोना प्रतिकूलता कालावधीमध्ये हा उपक्रम प्रथमतःच ऑनलाइन वर्च्युअल पद्धतीने साजरा होत असून देशभरातील दोन हजार शाळांमधून विजेते निवडले जाणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here