नेहरू पुतळा सुशोभीकरणाबाबत महसूलमंत्री थोरातांच्या उपस्थितीत बैठक, किरण काळेंची माहिती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 27, 2021

नेहरू पुतळा सुशोभीकरणाबाबत महसूलमंत्री थोरातांच्या उपस्थितीत बैठक, किरण काळेंची माहिती

 नेहरू पुतळा सुशोभीकरणाबाबत महसूलमंत्री थोरातांच्या उपस्थितीत बैठक, किरण काळेंची माहिती

काँग्रेस पदाधिकारी तसेच केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटच्या प्रश्नांवर देखील बैठक
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः लालटकी येथील नेहरू पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या विषयावर महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात हे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांच्यासह संबंधित अधिकार्‍यांची बैठक उद्या (दि. 27) घेणार आहेत. सदर बैठक आयोजित करण्याबाबतची मागणी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी बुधवारी ना. थोरात यांना मुंबई येथे भेटून केली होती. त्यावर तात्काळ बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे.
    ना. बाळासाहेब थोरात उद्या नगर शहराच्या दौर्‍यावर येत आहेत. दिवसभर अनेक कार्यक्रमांना, बैठकांना ते उपस्थित असणार आहेत. दौर्‍याबाबत माहिती देताना काळे यांनी म्हटले आहे की, काँग्रेस कमिटीच्या कालिका प्राईड येथील कार्यालयामध्ये सकाळी 10.30 वा. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक ना. थोरात यांच्या उपस्थितीमध्ये पार पडेल.
   त्यानंतर जिल्हा बँकेत त्यांची काही वेळासाठी उपस्थिती असणार आहे. नेहरू पुतळाच्या विषयाबाबत दुपारी 3.00 वा. शासकीय विश्रामगृह संबंधित अधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
   केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटच्या विविध प्रश्नांसंदर्भात स्थानिक उद्योजकांनी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची नुकतीच भेट घेत त्यांना उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली होती.
     केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट मधील लघू व मध्यम उद्योजकांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये काळे यांच्या पुढाकारातून महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थिती मध्ये विशेष बैठकीचे आयोजन दुपारी 3.30 वा. करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकार्‍यांसह एमआयडीसीचे संबंधित अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment