पुन्हा गुन्हा घडल्यास थेट कारवाई ः सानप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 23, 2021

पुन्हा गुन्हा घडल्यास थेट कारवाई ः सानप

 पुन्हा गुन्हा घडल्यास थेट कारवाई ः सानप


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी (22 मार्च) टू प्लस मधील सर्व आरोपींची प्रत्यक्ष पाहणी करून पुन्हा गुन्हे केल्यास कारवाई केली जाईल, अशी तंबी नगर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी राजेंद्र सानप यांनी दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात टू प्लस अंतर्गत गुन्हेगारांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नगर तालुका पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी या टू प्लस मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात नगर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी राजेंद्र सानप यांनी उपस्थित काही आरोपींना महिन्यातून एकदा नगर तालुका पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले.

No comments:

Post a Comment