चांगली चव व आपुलकीची सेवा दिल्यास हॉटेल व्यवसायात यश मिळते : आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 9, 2021

चांगली चव व आपुलकीची सेवा दिल्यास हॉटेल व्यवसायात यश मिळते : आ. जगताप

 गुलमोहोर रोडवरील श्री मिसळ सेंटरचे उद्घाटन

चांगली चव व आपुलकीची सेवा दिल्यास हॉटेल व्यवसायात यश मिळते : आ. जगताप

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोड परिसरात रहिवासी कॉलनींबरोबरच विविध कार्यालये, दवाखाने, आस्थापना वाढलेल्या आहेत. त्यामुळे या परिसरात व्यवसायही वाढत असून लोकांना पोटपूजेची रूचकर व्यवस्था श्री मिसळ व स्नॅक्स सेंटरमुळे झाली आहे. चांगली चव, हायजीन आणि आपुलकीची सेवा दिल्यास हॉटेलिंग व्यवसायात मोठे यश शक्य आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले. गुलमोहोर रोडवर नव्याने सुरु झालेल्या श्री मिसळचे उद्घाटन आ.जगताप यांच्या हस्ते नुकतेच झाले. याप्रसंगी श्री मिसळचे आनंद मुळे, निलेश बोपर्डीकर, रोहन चाटे, महेंद्र उपाध्ये, विपुल वाखुरे, दिलीप देशपांडे, अजिंक्य डोक्रस आदी उपस्थित होते.
    आनंद मुळे यांनी सांगितले की, श्री मिसळ व स्नॅक्स सेंटर येथे खवय्यांना रूचकर व आपुलकीचा स्वाद मिळेल. याठिकाणी स्पेशल मिसळ, साबुदाणा खिचडी, तर्री वडा, पोहे, उपमा, वडापाव अशा नाश्त्याची तसेच चहा, कॉफी, लिंबू सरबत अशी व्यवस्था आहे. अतिशय स्वच्छ व हायजेनिक वातावरणात सर्व पदार्थ ग्राहकांना मिळतील. आरामदायी बैठक व्यवस्था असल्याने प्रत्येकाला निवांत वातावरणात येथील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. याठिकाणी पार्सलची सुविधा उपलब्ध असल्याचे मुळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here