कल्याणरोड परिसरात 4 ते 5 दिवसांनी पाणीपुरवठा केला जाणार ः गोरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 11, 2021

कल्याणरोड परिसरात 4 ते 5 दिवसांनी पाणीपुरवठा केला जाणार ः गोरे

 कल्याणरोड परिसरात 4 ते 5 दिवसांनी पाणीपुरवठा केला जाणार ः गोरे

लेखी आश्वासनानंतर शिवसेना नगरसेवक सचिन शिंदे यांचे आमरण उपोषण मागे

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः शिवसेनेचे नगरसेवक सचिन शिंदे यांनी कल्याणरोड परिसराच्या पाणीप्रश्नासाठी आजपासून महापालिकेमध्ये आमरण उपोषणास आजपासून सुरुवात केली. यानंतर आयुक्त शंकर गोरे यांनी सायंकाळी उपोषणाची दखल घेत  कल्याणरोड पाणीप्रश्नबाबत बैठकीचे आयोजन करुन लेखी आश्वासनाद्वारे सांगितले की, कल्याणरोडचा पाणीप्रश्न लवकरच मार्गी लागेल. वसंत टेकडी येथे तातडीने 10 अश्व शक्तीची मोटार बसवून असून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा दुपारी 1 वाजल्यापासून चालू केल्यामुळे पूर्वी कल्याणरोड भागाल 4-6 पाणीपुरवठा केला जात होता. आता 12 तास पाणीपुरवठा केला जाणार असल्यामुळे नागरिकांना 10 ते 12 दिवसांनी मिळणारे पाणी आता 4 ते 5 दिवसांनी मिळणार आहे. त्यामुळे नगरसेवक सचिन शिंदे यांच्या उपोषणामुळे पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. गणेशनगर येथील उंच पाण्याच्या टाकी खालील पंपवेल बांधकाम करण्याकरिता टेंडर मागविण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे. निविदा प्रक्रिया येत्या 15 दिवसात राबविण्यात येणार असल्यामुळे या टाकीद्वारेही कल्याणरोड भागाला पूर्ण दाबाने पाणी मिळणार आहे, असे लेखी आश्वासन उपोषणकर्ते नगरसेवक सचिन शिंदे यांना आयुक्त शंकर गोरे यांनी दिली.

9.51
यावेळी संभाजी कदम, दिलीप सातपुते, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक शाम नळकांडे, माजी नगरसेवक संजय शेंडगे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, उपायुक्त यशवंत डांगे, पाणीपुरवठा विभागप्रमुख रोहिदास सातपुते, पारुनाथ ढोकळे व नागरिक उपस्थित होते.जोपर्यंत कल्याणरोड परिसराचा पाणीप्रश्न सुटत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा इशारा यावेळी नगरसेवक शिंदे यांनी महापालिका प्रशासनास दिला. कल्याणरोड परिसराचा विस्तार मोठ्या झपाट्याने होत असून नागरी लोकवस्ती वाढत आहे. परंतु गेल्या पंधरा वर्षापासून या भागाचा पाणी प्रश्न गंभीर स्वरूपाचा बनलेला आहे. या भागातील नागरिकांना पाणी समस्याला वारंवार तोंड द्यावे लागत आहे. महापालिका प्रशासनाला निवेदन देऊनही पाणी प्रश्न सुटलेला नाही. विविध आंदोलने, रस्ता रोको, पालिकेत नागरिकांसह पालिका प्रशासनाबरोबर पाणी प्रश्नाबाबत हजोरोवेळा चर्चा झाली. तरीसुद्धा पाणी प्रश्न सुटलेला नाही. कल्याणरोड परिसरातील गणेशनगर येथे दहा वर्षापूर्वी पाण्याची टाकी बांधून तयार आहे. परंतु या टाकीमध्ये आजपर्यंत पाणी आले नाही. त्यामुळे या भागामध्ये तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई आहे. तरी महापालिकेने गणेशनगर भागातील टाकीमध्ये पाणी पुरवठा करून सर्वभागाला पूर्णक्षमतेने पाणी द्यावे. जोपर्यंत सुरळीत सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. अनेकवेळा महापालिकेने पत्रव्यवहार करून दिलेले आश्वासने पूर्ण केली नाही. त्यामुळे पालिकेवरचा आमचा विश्वास उडाला आहे. पालिका संपूर्ण शहराला दिवसाआड पाणी पुरवठा करते व कल्याण रोड भागालाच दहा बारा दिवसांनीच पाणी पुरवठा का केला जातो. याभागातील नागरिक 100 टक्के महापालिकेचा कर भरला जातो. तरीसुद्धा कल्याण रोड भागावर पाणी प्रश्नाबाबत अन्याय का केला जातो? आज (दि. 10) रोजी महापालिकेमध्ये आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक संचिन शिंदे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here