वृक्षांच्या माध्यमातून मोफत ऑक्सिजन मिळतो : सातपुते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 4, 2021

वृक्षांच्या माध्यमातून मोफत ऑक्सिजन मिळतो : सातपुते

 वृक्षांच्या माध्यमातून मोफत ऑक्सिजन मिळतो : सातपुते

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वृक्षारोपण

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः वृक्षाशी प्रत्येकाने नाते निर्माण करून वृक्षांची लागवड करावी व त्यांचे संवर्धन करावे. त्यामुळे पर्यावरण समतोल राहण्यास मदत होईल. कोरोनाच्या काळामध्ये कृत्रिम ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत होता. वृक्षांच्या माध्यमातून आपल्याला मोफत ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे मनुष्याचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होते. यासाठी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन केले जाणार आहे. वृक्षारोपण ही एक लोकचळवळ निर्माण व्हावी. यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे जनजागृती होऊन वृक्षांचे संवर्धनही केले जाईल. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात एका वृक्षाची लागवड करावी, असे प्रतिपादन सचिन सातपुते यांनी केले.
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वृक्षांची लागवड करताना सचिन सातपुते, बाळासाहेब बेरड, जयसिंग भोर, संदीप वाकचौरे, तुळशीराम शेवाळे, विनोद साळवे, शांताराम साळवे, दत्तात्रय रक्टे, ज्ञानदेव बोठे आदी यावेळी उपस्थित होते.
   यावेळी बोलताना बाळासाहेब बेरड म्हणाले की, वृक्ष लागवडीची जबाबदारी फक्त शासनाची नव्हे तर प्रत्येक व्यक्तीची आहे. फक्त झाडे लावणे महत्वाचे नसून त्यांचे संवर्धन करणेही तितकेच गरजेचे आहे. अनेक शतकांपासून आपल्या अभंगातून संतांनी वृक्षांचे महत्त्व पटवून दिले आहे. यासाठी विविध संस्थांनी, संघटनांनी पुढे येऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment