गोकुळवाडीतील विकासकामांसाठी सदैव कटिबद्ध ः : आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 23, 2021

गोकुळवाडीतील विकासकामांसाठी सदैव कटिबद्ध ः : आ. जगताप

 स्व.भिमनाथ भंडारी समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा

गोकुळवाडीतील विकासकामांसाठी सदैव कटिबद्ध ः : आ. जगताप

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः गोकुळवाडीच्या विकास-कामासाठी सदैव आम्ही कटिबद्ध आहोत. या भागातील विविध प्रश्न प्रलंबित असून टप्प्याटप्प्याने मार्गी लावू. या भागातील युवकांना व्यायामासाठी व्यायाम शाळा तसेच अभ्यासिकेचे नियोजन करू. चांगल्या विचारांचे लोक एकत्र येऊन पुढच्या पिढीसाठी काम करणे गरजेचे आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही, यासाठी प्रत्येकाने शिक्षण घेणे गरजेचे आहे. या भागातील डॉ. सुनील साळी व प्रा. डॉ. संतोष शिंदे यांनी समाजामध्ये राहून समाजाचे प्रश्न सोडविण्याचा जो ध्यास घेतला ते कौतुकास्पद आहे. आपला समाज आपल्याबरोबर मोठा झाला पाहिजे. यासाठी समाजातील मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे, या हेतूने ते काम करत आहेत. समाजाचे स्व. भिमनाथ भंडारी यांच्या कामाचा वारसा पुढे नियमित चालवून सामाजिक प्रश्न मार्गी लागण्यासाठी ते सदैव कार्यशील असतात, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
यावेळी बोलतान महापौर वाकळे म्हणाले की, स्व. भिमनाथ भंडारी समाज मंदिराच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडतील. सर्व समाज एकत्र येऊन आपला उत्सव साजरा करतील. गोकुळवाडीतील विविध प्रलंबित प्रश्न महापालिकेच्या माध्यमातून सोडवू, असे ते म्हणाले.
   यावेळी सचिन जाधव म्हणाले की, अनेक दिवसांपासून समाज मंदिराचा प्रश्न प्रलंबित होता. तो मार्गी लावण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आहे. गोकुळवाडीत भव्यदिव्य असे समाज मंदिर उभे राहिले आहे. या भागातील देवी मंदिरासमोरील सभामंडप तसेच अभ्यासिका व व्यायाम शाळा सुरु करण्यासाठी पाठपुरवा करून लवकरच आ. संग्राम जगताप व महापालिकेच्या माध्यमातून मार्गी लावू, असे ते म्हणाले. अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून गोकुळवाडी येथे स्व. भिमनाथ भंडारी समाज मंदिराचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव, माजी सभागृह नेते आरिफ शेख, नगरसेविका जयश्री सोनवणे, माजी नगरसेवक संजय चोपडा, उबेद शेख, डॉ. सुनील साळी, प्रा. डॉ. संतोष शिंदे, बबलू सचदेव, सर्जेराव शिंदे, अंकुश भोरे, योगेश भंडारी, राम इंगळे, गोपाळ वाघमारे, प्रविण परदेशी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment