निमगाव वाघा येथे सावित्रीबाई फुले यांना स्मृतीदिनी अभिवादन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 11, 2021

निमगाव वाघा येथे सावित्रीबाई फुले यांना स्मृतीदिनी अभिवादन

 निमगाव वाघा येथे सावित्रीबाई फुले यांना स्मृतीदिनी अभिवादन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
   नवनाथ विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी शुभांगी धामणे व मंदा साळवे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, काशीनाथ पळसकर, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, कला शिक्षक उत्तम कांडेकर, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, लहानबा जाधव आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
   पै. नाना डोंगरे म्हणाले की, आजच्या पिढीला सावित्रीबाई फुले यांचे कार्य व विचार समजण्याची गरज आहे. स्त्री शिक्षणाने आज समाजात क्रांती झाली आहे. स्त्री शिक्षणाची मशाल प्रज्वलीत करणार्या सावित्रीबाईंचे कार्य आजही दीपस्तंभासारखे आहे. प्रवाहा विरोधात जाऊन त्यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य केले. आजची कर्तुत्ववानस्त्रीचे श्रेय सावित्रीबाईंना जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास मुख्याध्यापक किसन वाबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment