ग्राहकांना उत्कृष्ट सेवा दिल्यामुळे पुना दाल, हिरा बेसन मिलने केला सोने-चांदीच्या नाण्यांनी व्यावसायिकांचा सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 9, 2021

ग्राहकांना उत्कृष्ट सेवा दिल्यामुळे पुना दाल, हिरा बेसन मिलने केला सोने-चांदीच्या नाण्यांनी व्यावसायिकांचा सन्मान

 ग्राहकांना उत्कृष्ट सेवा दिल्यामुळे पुना दाल, हिरा बेसन मिलने केला सोने-चांदीच्या नाण्यांनी व्यावसायिकांचा सन्मान

कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचेही केले आवाहन

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
कोरोनाच्या महामारीपासून आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. हे सर्व लक्षात घेता माणुसकीचे नाते जपण्यासाठी 1960 पासून कार्यरत असणारी पारख ग्रुपची महाराष्ट्रातील नामांकित पुना दाल,हिराबेसनमिळ पुणे या कंपनीने महाराष्ट्रातील व्यावसायिकांसाठी व ग्राहकांसाठी लाभदायक योजना काढली होती. योजनेला संपूर्ण महाराष्ट्र्तून व्यावसायिकांनी व ग्राहकांनी  चांगला प्रतिसाद दिला. जेणेकरून सर्वसामान्य लोकांना याचा फायदा झाला. अहमदनगर जिल्ह्यातील 178 तर नगर शहरातील 35 ग्राहकांचा सम्मान करण्यात आला आहे.
कंपनीच्या योजना अंतर्गत नगर शहरातील दाळमंडई, आडते बाजार, मार्केट याड मधील जा व्यापार्‍यांनी आपले योगदान देऊन ग्राहकांना उत्कृष्ट सेवा दिल्यामुळे पुना दालमिळच्या वतीने संतोष कटारिया यांनी व्यापारी दिलीप सुराणा, रतिलाल कटारिया, गिरीष फिरोदिया, महावीर कटारिया, विष्णू नवलाणी यांना 10 ग्राम सोने, 100 ते 300 ग्राम चांदीचे नाणे देण्यात आले.
    याप्रसंगी संतोष कटारिया म्हणाले गेल्या 60 वर्षापासून  या कंपनीला महाराष्ट्रातील जनता ओळखत आहे. या कंपनीने कायम समाजाच्या सुख- दुखात आपला सहभाग नोंदवला आहे. सर्वांनी कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन केले पाहिजे असेही अहवाल या वेळी करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here