महिलांना अधिकाधिक स्वायत्ता प्रदान झाली पाहिजे- तेजस्वीनी सातपुते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 9, 2021

महिलांना अधिकाधिक स्वायत्ता प्रदान झाली पाहिजे- तेजस्वीनी सातपुते

 ‘महिला सक्षमीकरण’ या विषयांवरील वेबीनार संपन्न

महिलांना अधिकाधिक स्वायत्ता प्रदान झाली पाहिजे- तेजस्वीनी सातपुते

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः आजच्या काळात महिलांची निर्णय क्षमता प्रबळ होणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील विविध घटकांनी महिला विकास व सुरक्षितता तसेच स्वायत्ततासाठी प्रबोधन करणे आवश्यक आहे. महिलांनी प्राचिन काळासून महत्वपूर्ण योगदान दिले आहे. चूल आणि मुल तसेच घर सांभाळने ही जबाबदारी महिलांइतकी यशस्वी जबाबदारी कुणीही पार पाडलेली नाही. हे महिलांचे योगदान महत्वपूर्ण आहे. महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांच्या कामाचा दर्जा कायम राहून तिला अधिकाधिक स्वायत्ता प्रदान झाली पाहिजे. महिलांना संस्काराचा भाग म्हणून जितके शिक्षण महत्वाचे आहे, तितकेच विकासाचा भाग म्हणूनही स्वायत्ता आवश्यक आहे, असे प्रतिपादन  सोलापूरच्या पोलिस अधिक्षक  तेजस्वीनी सातपुते यांनी केले.
अहमदनगर महाविद्यायात गांधी अभ्यास केंद्र व उन्नत भारत अभियानच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त ‘महिला सक्षमीकरण’ या विषयांवर एक दिवशीय ऑनलाईन वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूरच्या पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तेजस्वीनी सातपुते (एपीएस) यांनी महिला सक्षमीरकणावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या वेबीनारच्या प्रमुख पाहुण्या डॉ.स्वाती बार्नबस यांनी भेदभावरहित महिला सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. महिलांनी व्यक्तीमत्व विकासातून संरक्षण क्षमता विकसित करावी, जेणे करुन महिलांना सर्वांगिण विकासास वाव मिळेल. वाचनाची समृद्धी महिला विकासास पोषक परिस्थिती निर्माण करते.
   या वेबीनारचे स्वागत प्राचार्य आर.जे.बार्नबस यांनी केले. गांधी अभ्यास केंद्राचे संचालक यांनी प्रास्तविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय उन्नत भारत अभियान संचालक प्रा.विलास नाबदे यांनी करुन दिला तर शेवटी प्रा.सुधीर वाडेकर यांनी आभार मानले. महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक यामध्ये सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment