उत्तम सेवा देऊन पतसंस्थेने लौकिक कायम ठेवला - रखमाजी निस्ताने - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 30, 2021

उत्तम सेवा देऊन पतसंस्थेने लौकिक कायम ठेवला - रखमाजी निस्ताने

 कैलास नागरी पतसंस्थेचे ऑनलाईन सभा संपन्न

उत्तम सेवा देऊन पतसंस्थेने लौकिक कायम ठेवला - रखमाजी निस्ताने

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः येथील कैलास नागरी सहकारी पतसंस्थेची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन रखमाजी निस्ताने यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ऑनलाईन खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. याप्रसंगी व्हाईस चेअरमन चंद्रकांत औशिकर, लक्ष्मण भागानगरे, लक्ष्मण हरबा, अनंत औशिकर, रामा विधाते आदि उपस्थित होते.
   याप्रसंगी चेअरमन रखमाजी निस्ताने म्हणाले, कैलास नागरी सहकारी पतसंस्थेने सभासदांच्या हितांचे निर्णय घेऊन विविध योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ कसा होईल यादृष्टीने प्रयत्न केले आहे. गेल्या वर्षभरात कोरोना काळातही संस्थेने सभासद, ठेवीदार, कर्जदार यांना उत्तम सेवा देऊन चांगले काम केले आहे. सध्या संस्थेचे सभासद संख्या 1772 असून, भाग भांडवल 23,84.225 इतके आहे. एकूण ठेवी लोकमंगल ठेव 24.77 लाख, मुदत ठेव 962.52 लाख, दामदुप्पट ठेव 25.31 लाख, बचत ठेव 4.55 लाख, रिकरिंग ठेव 20.59 लाख याप्रसंगी एकूण 103.77 लाख जमा आहेत.
   संस्थेची स्व:मालकीचे सुसज्य व प्रशास्त इमारत असून, संस्थेने जामिनकी कर्ज, स्थावर तारण कर्ज, वाहन तारण कर्ज तसेच ठेव तारण कर्ज वाटप केले आहे. अहवाल साला अखेर संस्थेने सभासदांना 8 कोटी 80 लाख रुपये कर्ज वाटप केले आहे. संस्थेस 31/3/2020 अखेर 8 लाख 50 हजार 766 रुपयांचा नफा झाला असून, सभासदांना 12 टक्के डिव्हिडंट (लाभांष) वाटपाचा निर्णय संंचालक मंडळाने घेतला असल्याचे चेअरमन रखमाजी निस्ताने यांनी सांगितले. याप्रसंगी पतसंस्थेचे सेक्रेटरी शंकर मिसाळ यांनी वार्षिक ताळेबंद व नफा-तोटा पत्रक सादर करुन सभेपुढील विषय वाचून दाखविले. सर्व सभासदांनी सर्व विषयास एकमताने मंजुरी दिली. या ऑनलाईन सभेस संचालक बाळासाहेब खताडे, हिरामण बेद्रे, शंकर पंगुडवाले, संतोष हरबा, सागर चवंडके, धोंडीराम मिसाळ आदिंसह अनेक सभासदांनी उपस्थित राहून सभेच्या कामकाजात भाग घेतला. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना चेअरमन व संचालक मंडळाने समर्पक उत्तरे देऊन समाधान केले.  यावेळी कर्मचारी व लोकमंगल ठेव प्रतिनिधी यांचा संचालक मंडळाच्यावतीने गौरव करण्यात आला.व्यवस्थापक शंकर मिसाळ यांनी सर्वांचे स्वागत करुन शेवटी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here