कोरोनाचा उद्रेक कायम... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 30, 2021

कोरोनाचा उद्रेक कायम...

 कोरोनाचा उद्रेक कायम...

24 तासात वाढले 1100 रुग्ण!

अहमदनगर-
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम असून चोवीस तासांत तब्बल 1100 रुग्ण वाढले आहेत. नगर शहरात सर्वाधिक 399 रुग्ण आढळले. त्या खालोखाल संगमनेर तालुक्यात रुग्णसंख्या आहे. तिथे 100 एवढी आहे. तालुकानिहाय सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे  ः अहमदनगर शहर 399, राहाता 64, संगमनेर 100, श्रीरामपूर 79, नेवासे 27, नगर तालुका 42, पाथर्डी 18, अकोले 62, कोपरगाव 17, कर्जत 08, पारनेर 27, राहुरी 50, भिंगार शहर 75, शेवगाव 40, जामखेड 71, श्रीगोंदे 16 आणि इतर जिल्ह्यातील 05 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 332, खाजगी प्रयोगशाळेनुसार 395 आणि रॅपिड चाचणीमध्ये 373 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.

No comments:

Post a Comment