ग्राहकांस मारहाण केल्याप्रकरणी या हॉटेल चालकांस 10 वर्ष सक्तमजुरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 25, 2021

ग्राहकांस मारहाण केल्याप्रकरणी या हॉटेल चालकांस 10 वर्ष सक्तमजुरी

 ग्राहकांस मारहाण केल्याप्रकरणी या हॉटेल चालकां 10 वर्ष सक्तमजुरी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः जेवण लवकर तयार न झाल्याने पार्सल मागितल्याचा राग आल्यामुळे हॉटेल चालक मतीन गफार शेख, व मोबीन शेख यांनी ग्राहक कलीम जहागीरदार व वासिम शेख यांना मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा सत्रन्यालयाने 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी 51,000 रुपयांचा दंड केला आहे.
   सदर घटनेची हकीकत अशी की, कलिम जहागिरदार, वसिम शेख व त्याचा मित्र हे 27 एप्रिल 2012 रोजी रात्री नगर कॉलेजजवळील चायनीज हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. मात्र, लवकर जेवण तयार न झाल्याने कलिम जहागीरदार यांनी पार्सल देण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने हॉटेलचालक मतीन गफार शेख याने वसिम शेख यांना मारहाण केली. याबाबत जाब विचारणार्‍या कलिम जहागिरदार यांना मतीन व मोबिन गफार शेख यांनी मारहाण केली. याबाबत कलिम जहागीरदार यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात मतीन व मोबिन शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक बी. एस. नागरगोजे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारतर्फे या खटल्यात 7 साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, जखमींवर उपचार करणारे डॉक्टर, तपासी अधिकार्‍यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. न्यायालयाने दोघांना प्रत्येकी 10 वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंड ठोठावला. सरकार पक्षातर्फे ऍड. मोहन कुलकर्णी यांनी काम पाहिले. सहायक फौजदार भानुदास बांदल यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

No comments:

Post a Comment