‘स्थायी’ सभापती पदी अविनाश घुले! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 4, 2021

‘स्थायी’ सभापती पदी अविनाश घुले!

 ‘स्थायी’ सभापती पदी अविनाश घुले!

शिवसेनेची निवडणुकीतून माघार.. राष्ट्रवादी-भाजपा दोस्तीवर शिक्कामोर्तब...

ये..दोस्ती. हम नही, तोडेंगे !


अहमदनगर -
‘स्थायी’ची निवडणूक लढविण्याचा निर्णय शिवसेनेच्या शहरातील नेत्यांनी घेतला होता पण राज्यस्तरीय शिवसेना नेत्यांनी आज या निवडणुकीतून माघार घेण्याचे आदेश दिले. यानंतर शिवसेनेचे स्थायीचे उमेदवार विजय पठारे यांनी अर्ज माघारी घेतला.व पीठासीन अधिकारी राजेंद्र भोसले यांनी अविनाश भोसले यांची स्थायीच्या सभापती पदावर बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. आणि भाजप ,राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी एकच जल्लोष केला.

   आज 3 वाजता पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे उपस्थितीत स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरुवात झाली. स्थायी समिती सभापती पदाचे उमेदवार अविनाश घुले तीन वाजता सभागृहात आले. त्यांचे समवेत भाजपाचे सोनाबाई शिंदे, मनोज कोतकर, वंदना ताठे, रवींद्र बारस्कर राष्ट्रवादी काँग्रेसचे समद खान, प्रकाश भागानगरे, सागर बोरुडे, परवीन कुरेशी काँग्रेसच्या सुप्रिया जाधव बसपाचे मुदस्सर शेख यांनी सभागृहात प्रवेश केला.शिवसेनेचे 3 नगरसेवक शाम नळकांडे, सचिन शिंदे व परशुराम गायकवाड सभागृहात अनुपस्थित राहिले. त्याच वेळी सेनेने या निवडणुकीतुन माघार घेतल्याचे स्पष्ट झाले.शिवसेनेचे स्थायीचे उमेदवार विजय पठारे व शिवसेनेच्या रिता भाकरे सभागृहात आले व पठारे यांनी या निवडणुकीत अर्ज माघारी घेत असल्याचे जाहीर केले. नवनिर्वाचीत स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांना विजय पठारे व रिता भाकरे यांनी शुभेच्छा दिल्या व ते सभागृहातून निघून गेले. पीठासीन अधिकारी राजेंद्र भोसले यांनी अविनाश घुले यांचा एकच अर्ज राहिल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले त्यावेळी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकच जल्लोष केला.

No comments:

Post a Comment