त्या दिव्यांग शिक्षकावर कारवाई करू नये, अन्यथा सहाय्य सेना व प्रहार अपंग क्रांती संस्था या संघटना जि.प.समोर तीव्र आंदोलन करणार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 13, 2021

त्या दिव्यांग शिक्षकावर कारवाई करू नये, अन्यथा सहाय्य सेना व प्रहार अपंग क्रांती संस्था या संघटना जि.प.समोर तीव्र आंदोलन करणार

 त्या दिव्यांग शिक्षकावर कारवाई करू नये, अन्यथा सहाय्य सेना व प्रहार अपंग क्रांती संस्था या संघटना जि.प.समोर तीव्र आंदोलन करणार


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः एका दैनिकामध्ये एका तथाकथित दिवंगत संघटनेच्यावतीने  मुख्य कार्य अधिकारी यांना निवेदन देऊन त्या निवेदनामध्ये दिव्यांग शिक्षक ग्रुप वर एक अश्लील व्हिडिओ टाकून बदनामी केल्याबाबत कळविले आहे, परंतु असले व्हिडीओ असा कुठले दिव्यांग ग्रुपवर टाकलेला नाही. तथाकथित बदनामी करणारे व्यक्ती शिक्षक नाहीत तरीपण त्यांनी याग्रुप वरील माहिती  खोटया माहितीच्या आधारे बदनामी करण्यासाठी व स्वतःच्या प्रसिद्धी हव्यासासाठी निलंबनाची मागणी करून स्वतःची पोळी भाजण्याचा हा एक प्रकार त्यांनी केलेला आहे.
   या विरोधात शिवसेना अपंग सहाय्य सेनेच्या वतीने आम्ही  सदर शिक्षकावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा जर आपण दाखल केला तर आम्ही सुद्धा जिल्हा परिषदेच्या समोर दिनांक 16 मार्च रोजीच घंटानाद आंदोलन करू असा इशारा जिल्हाध्यक्ष जालिंदर लहामगे व प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अँड. लक्ष्मणराव पोकळे आदींनी दिला आहे.ज्या शिक्षकाबाबत निवेदन देऊन बदनामी केलेली आहे ते शिक्षक सामाजिक चळवळीत नेहमी अग्रेसर असतात आत्तापर्यंत त्यांनी मोठमोठी पदे भुषविली आहेत.  त्यांच्याकडून अशा कुठल्या प्रकार स्वतःहून झालेला नसून हा खोडसाळपणाने केलेला आहे. हा प्रकार म्हणजे त्यांची बदनामी करण्याचा व त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवून हा प्रकार केला जात आहे.  त्यांची विनाकारण बदनामी करण्याचा हा किळसवाणा प्रकार आहे म्हणून हा प्रकार  या संघटना सहन करणार नाही म्हणून आपण तथाकथित दिलेल्या निवेदनामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई या शिक्षकावर होऊ नये, अशी आपणास नम्र विनंती आहे.

No comments:

Post a Comment