तीन महिन्यांपासून, पोलिसांना गुंगारा देणारा. वेषांतर करून राहणारा मास्टर माईंड सापडला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 13, 2021

तीन महिन्यांपासून, पोलिसांना गुंगारा देणारा. वेषांतर करून राहणारा मास्टर माईंड सापडला

 हैदराबादमधील थरार! सहा पोलीस पथकांचे पाच दिवस अथक परिश्रम.

तीन महिन्यांपासून, पोलिसांना गुंगारा देणारा. वेषांतर करून राहणारा मास्टर माईंड सापडला
पोलीस अधीक्षकांपुढे आव्हान; लोकेशरवरून बोठे ट्रेस; 100 शहरांमध्ये सर्च ऑपरेशन
  रेखा जरे यांचे हत्येला आज 102 दिवस पूर्ण झाले आहेत, यातील प्रमुख आरोपी बाळ बोठे याला गजाआड करण्याचे मोठे आव्हान जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटीलांपुढे निर्माण झाले होते. प्रसिद्धी माध्यमांमधून पोलिसांच्या तपास यंत्रणेवरच संशय व्यक्त केला जात होता. पोलिसांवर कोणाचा राजकीय दबाव आहे का? पोलीस मॅनेज झाले आहेत का? असे आरोप होत असताना मनोज पाटील यांनी विचलित न होता.बोठे साठी सर्च ऑपरेशन मोहीम राबविली. देशातील लुधियाना,भटिंडा,चंदिगड, भोपाळ, छत्तीसगड सह प्रमुख 100 शहरांमध्ये पोलिसांशी संपर्क, खबर्‍यांचे नेटवर्क, सायबर सेलची यंत्रणा राबवून बोठेंना शोधण्याचा प्रयत्न केला, हैदराबाद पोलीस, नगर जिल्हा सायबर सेल, मुंबई क्राईम ब्रँच, सोलापूर क्राईम ब्रँच, हैदराबाद सीआयडी टीम, 5 दिवसांपासून बोठेंचा शोध घेत होती.बोठे याने वेषांतर केले असल्याचा हैदराबाद सीआयडीचा संशय होता. मोबाईल लोकेशनवर बोठेंचा तपास केला जात होता, पण प्रत्येक वेळी तो पोलिसांना गुंगारा देत होता. पण आज पहाटे टेक्निकल टीमला नेमके लोकेशन सापडले नी बोठेंच्या मुसक्या आवळण्यास पोलीस प्रशासनास यश आले.
हैदराबाद.. बिलाल नगर मधील लॉज रूम नं 109
  हैदराबाद मधील बिलाल नगर. या मुस्लिम मोहल्ल्यामध्ये मोठी दाट वस्ती आहे. प्रामुख्याने गुन्हेगारी क्षेत्र असणारा हा एरिया बाळ बोठे याने आश्रयासाठी शोधला. बाहेरून कुलूप लावून बोठे पोलिसांच्या हालचाली पहात असल्याचे दिसून आले आहे. नगर मधील महेश तनपुरेच्या माध्यमातून सर्व माहिती बोठे  यास देण्यात येत होती. हैदराबाद मधील वकील जनार्दन अकुला चंद्रप्पा यांनी आत्तापर्यंत अनेक गुन्हेगारांना आश्रय देऊन मदत केली आहे. यासाठी ते मोठी फी वसूल करीत असत. राज शेखर चाकली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहेमान अब्दुल अरिफ हे गुन्हेगारी क्षेत्रातील हैदराबाद मधील व्यक्ती अकुला चंद्रप्पा यांना या कामासाठी मदत करीत असत. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.बोठे यांना मदत करणारे हैदराबाद मधील आणखी एक व्यक्ती पी. अनंत लक्ष्मी व्यंकटरमण सुब्बाचारी फरार आहे.बोठे वापरत असणारे मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आले असून पोलीस याद्वारे नगर मधून बोठे फरार झाल्यापासून त्यास कोणी आश्रय दिला हे शोधू शकतील. येत्या काही दिवसांत नगरमधील आणखी काही व्यक्तींना अटक होण्याची शक्यता आहे.
 
   30 नोव्हेंबर 2020.. जातेगाव घाट.. यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचे गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी 24 तासाच्या आत या हत्या प्रकरणातील 5 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींनी संपादक बाळ बोठेंने सुपारी देऊन रेखा जरेंची हत्या केल्याची कबुली दिली..नी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात खळबळ उडाली. बोठेचं नाव मास्टर माईंड म्हणून पुढे यावं त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली. पत्रकारितेत मोठं वलय असणारा बोठे व सकाळ सारखा मोठा वृत्तसमूह पाठीशी असणार्‍या बोठेंला कसा हात लावावा ? अशी चर्चा सुरू असताना बोठे पसार झाला. पत्रकारितेत जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात स्वतःचा मोठा ठसा उमटविणारा बोठे या प्रकरणामुळे ठेंगणा वाटू लागला. पत्रकारितेच्या नावाखाली गडगंज कमवलेली संपत्ती व प्रतिष्ठा कमविणार्‍या बोठेला या शहरातून त्या शहरांकडे पळावे लागले. त्याच्या मोठ्या चर्चा प्रसिद्धी माध्यमातून रंगू लागल्या. कधी तो श्रीगोंद्यात, तर कधी नाशिक, अहमदाबाद, इंदोर मध्ये असल्याच्या चर्चा होऊ लागल्या. सराईत गुन्हेगाराप्रमाणे बोठे पोलिसांना चकवा देऊ लागला. जिल्हा पोलीस प्रशासन बोठे पुढे हतबल झालं की काय याची चर्चा सुरू झाली. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी त्याच्याकडून काहीतरी चूक होतेच. हैदराबाद मध्ये सोबत असणार्‍या एका गुन्हेगाराच्या मोबाईल वरून त्याने त्याचे कुटुंबीयांशी संपर्क साधल्यावर तो ट्रेस झाला, नी पोलिसांना त्याचे लोकेशन सापडले. पोलिसांनी आज पहाटे हैदराबादात त्याच्या मुसक्या आवळल्या.नगरी दवंडी/विशेष प्रिंतनिधी
अहमदनगर ः गेल्या तीन महिन्यापासून प्रसिद्धी माध्यमातून, खाजगी चर्चेत एकच प्रश्न चर्चिला जात होता. रेखा जरे हत्याप्रकरणातील प्रमुख मास्टर माईंड बाळ कोठे आहे? जिल्हा पोलिस प्रशासनाचे त्याला पाठबळ आहे का? या प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? आज जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी थंडपणे सर्व आरोपांना पत्रकार परिषदेतून उत्तरे दिली. आपल्यावर कोणताही राजकीय दबाव नव्हता ,तर पोलिसांची विविध पथके बोठेंच्या तपासासाठी जंग जंग कशी पछाडीत होती? याचा पाढाच वाचला. जरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी बाळ बोठे यास आज पहाटे हैदराबाद मधून ताब्यात घेतल्याची माहिती दिली. गेल्या सहा दिवसांपासून हैदराबाद मध्ये तळ ठोकुन राहिलेल्या पोलिस पथकातील टीमचे कौतुक करीत “कानून के हाथ कितने लंबे ह?” हे दाखवून दिले. तीन महिन्यांपासून पोलिसांना चकवा देण्यात बाळ बोठेला कोणाचा आशीर्वाद होता? कोणाचे पाठबळ होते? तो कुठे कुठे लपला होता?हे आता पोपटासारखे बोलेल यात शंका नाही. जिल्हा पोलीस प्रशासन गुन्हे अन्वेशन सायबर सेल यांनी तीन महिन्यापासून त्यांच्यावर होणार्‍या आरोपांनी विचलित न होता बोठेस गजाआड केले.  त्याबद्दल नगरकर त्यांचे निश्चित अभिनंदन करतील.

बाळ बोठे हा  हैद्राबाद मध्ये वेषांतर करून राहत होता. तेथील एका हॉटेल मधल्या रुम नंबर 109 मध्ये बी. जे. बी या नावाने तो राहत होता . या रुम ला पुढून कुलूप लावलेले असून मागच्या दाराने तो ये-जा करत असे. बाळ बोठे सह त्याच्या तीन सहकार्‍यांनादेखील अटक करण्यात आली आहे.  त्यांचे नावे पुढील प्रमाणे  1) बाळ जगन्नाथ बोठे रा. बालीकाश्रम रोड कमलनयन हॉस्पिटल समोर , 2) राजशेखर अजय चाकाली वय 25 रा, गुडुर करीमनगर मुस्ताबाद आंध्रप्रदेश तेलंगणा 3) शेख इस्माईल शेख आली वय 30 वर्षे राहणार खुबा कॉलनी शाईन नगर बालापुर सुरुरनगर रंगारेड्डी आंध्रप्रदेश तेलंगणा, 4)अब्दुल रहमान अब्दुल आरिफ वय 52 वर्षे राहणार चारमिनार मज्जित पहाडी शरीफ सुरूर नगर रंगा रेड्डी हैद्राबाद आंध्रप्रदेश 5) महेश वसंतराव तनपुरे वय 40 वर्षे धंदा व्यवसाय राहणार कुलस्वामिनी गजानन हाउसिंग सोसायटी नवलेनगर गुलमोहर रोड सावेडी अहमदनगर 6) जनार्दन अकुले चंद्रप्पा राहणार 14 -113 फ्लॅट नंबर 301 त्रिवेणी निवास रामनगर पी अँण्ड टी कॉलनी सारोमानगर रंगारेड्डी हैदराबाद तेलंगणा  यांना अटक करण्यात आली असून पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी रा हेंद्राबाद तेलंगणा फरार आहे. महेश वसंत तनपुरे यास नागरमध्येच अटक करण्यात आली असून  पैकी राजशेखर चाकाली शेख इस्माईल शेख आणि  अब्दुल रहमान अब्दुल आरिफ यांना पारनेर न्यायालयात हजार करण्यात आलं असून त्यांना 16 मार्च पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. नगर क्राईम ब्राच्या पथकाने 5 दिवसांच्या अथक ऑपरेशन करून औरंगाबाद पोलीस हेंद्राबाद पोलीस कमिश्नर यांच्या मदतीने आणि शेवटचे 24 तास तर न झोपता कारवाई करून या आरोपींना अटक करण्यात आली या मध्ये सोलापूर मुंबई क्राईम ब्रांच सायबर टेक्निकल अनालिसिस च्या आधारे केलेल्या विशलेषणामुळे या कारवाईला यश आले.
   या कारवाईत पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस असंधिकारी अजित पाटील नगर ग्रामीण विभागाचे अनिल कटके , कर्जत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यादव , संभाजी गायकवाड, महिला पोलीस निरीक्षक गडकरी , सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप , मिथुन घुगे , दिवटे, समाधान सोळंखे , पो हे कॉ रवींद्र पांडे , पोना रविकिरण सोनटक्के , दीपक शिंदे , राहुल गुंडू , अभिजित अरकल, महिला पोना जयश्री फुंदे , पोना संतोष लोंढे , गणेश धुमाळ , भुजंग बडे, पोकॉ  सचिन वीर , सत्यम शिंदे , चौघुले, मिसाळ , सानप , रणजित जाधव , बुगे , जाधव , चापोकॉ जाधव , दातीर , पोकॉ प्रकाश वाघ चापोना  राहुल डोळसे , चापोकॉ रितेश वेताळ, आदींनी हि कारवाई केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here