बेलवंडी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, 5 जणांना घेतले ताब्यात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 30, 2021

बेलवंडी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, 5 जणांना घेतले ताब्यात

 बेलवंडी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, 5 जणांना घेतले ताब्यात

महिला पोलिस कॉन्स्टेबलने दोघांना पाठलाग करुन पकडले
     बेलवंडी पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी अरणगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा मारल्यानंतर जुगार खेळणारे दोघेजण पळून जात असताना पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस कॉन्स्टेबल सुरेखा वळवे यांनी पळून जाणार्‍या दोघांचा पाठलाग करत त्यांना सिंघम स्टाईल पकडले. पोलिस निरिक्षक संपतराव शिंदे यांनी त्याचे खास कौतुक केले.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव येथे चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या पथकाने छापा टाकून तिरट नावाचा हारजितीचा जुगाराचा खेळ खेळत असलेल्या पाच जुगार्‍याना रंगेहाथ पकडले याप्रकरणी 5 जणांवर कारवाई करण्यात आली.
   बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना अरणगाव येथे ओढ्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली उघडयावर जुगार चालू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून पोलिस पथकाने छापा टाकला असता तेथे 5 जण तिरट नावाचा हारजितीचा जुगाराचा खेळ खेळत असलेले आढळून आले. या प्रकरणी राजू सुखदेव शिंदे, हनुमंत बबन कुताळ, नंदू आनंदा रणदिवे, बागूल नामदेव कुटे , राहुल लक्ष्मण आढाव रा.आरणगाव ता. श्रीगोंदा यांच्यावर बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे, पो.ना.संतोष गोमसाळे,पठारे ज्ञानेश्वर, पो.काँ. संपत गुंड, विकास कारखिले, सचिन पठारे, म.पो.काँ.सुरेखा वळवे, यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here