मिरावली दर्गा ट्रस्टच्यावतीने सत्कार सर्वांगिण विकासासाठी आपले प्रयत्न- आ. शिवाजी कर्डिले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 13, 2021

मिरावली दर्गा ट्रस्टच्यावतीने सत्कार सर्वांगिण विकासासाठी आपले प्रयत्न- आ. शिवाजी कर्डिले

 मिरावली दर्गा ट्रस्टच्यावतीने सत्कार सर्वांगिण विकासासाठी आपले प्रयत्न- आ. शिवाजी कर्डिले


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः मिरावली बाबांवर अनेक भाविकांची मोठी श्रद्धा आहे, हे जागृत देवस्थान असल्याने राज्यातील विविध भागातून या ठिकाणी नागरिक येत असतात. या भागाचा विकास झाला पाहिजे, येणार्या भाविकांना सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशिल राहून सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या परिसराचा विकास सर्वांगिण विकासासाठी आपले प्रयत्न आहेत. आज ट्रस्टच्यावतीने आपला सन्मान करुन काम करण्यास प्रोत्साहन दिले आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे नुतन संचालक शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
   जिल्हा बँकेच्या संचालकपदी माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांची निवड झाल्याबद्दल हजरत सय्यद इसहाक पिर मिरावली दर्गा ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वंशावळ विश्वस्त आसिफ खान पिर खान पठाण, विश्वस्त चेअरमन हाजी अन्वर खान, मुजावर खादिम हाजी गोटू जाहागिरदार, अर्शद पठाण आदि उपस्थित होते. याप्रसंगी आसिफ खान पिर खान पठाण म्हणाले, आमदारकीच्या काळात शिवाजीराव कर्डिले यांनी मिरावली  पहाड परिसरातील विविध विकास कामांसाठी मोठे सहकार्य केले; आजही करत आहेत. सर्वसामान्यांसाठी झटणारे नेते म्हणून ते सर्वांना परिचय आहेत. मागील काळात जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्यांचे प्रश्न सोडविल्यामुळे त्यांची पुन्हा संचालकपदी निवड झाली आहे. ही त्यांच्या कामाची पावती असल्याचे सांगून त्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here