‘ना भय.. ना चिंता..कोरोना संसर्गाचे गांभीर्य सरले..!’ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 13, 2021

‘ना भय.. ना चिंता..कोरोना संसर्गाचे गांभीर्य सरले..!’

 नवनागपूरच्या बाजारात ग्राहक विक्रेत्यांचा विनामास्क मुक्त संचार..

‘ना भय.. ना चिंता..कोरोना संसर्गाचे गांभीर्य सरले..!’

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगरमध्ये कोरोना बधितांचा आकडा पाचशे पार गेला असतानाही कोणाला काहीच या महामारीचे भय, चिंता व  गांभीर्य राहिले नसल्याचे चित्र सध्या स्पष्ट झाले आहे. शहरला लागूनच असलेल्या नवनागापूर-सह्याद्री चौक परिसरात शनिवार च्या आठवडे बजारात कुठल्याही प्रकारची खबरदारी न घेता मास्क विनाच विक्रेते व ग्राहकांचा मुक्त संचार होत असल्याची बाब निदर्शनास आली.
   औदयोगिक परिसराचे हे क्षेत्र असल्याने याठिकाणी स्थानिक कामगारांसाह परप्रांतीय मजूर मोठया संख्येने काम करतात. येथील कंपन्यांना शनिवारी सुट्टी असते. याच परिसराला लागून, नागापूर, गजानन कॉलनी, निंबळक आदी गावांमध्ये कंपनीत काम करणारे कामगार मोठ्या संख्येने राहतात.  येथील कंपन्यांना शनिवारी सुट्टी असल्यामुळे शनिवारी याठिकाणी मोठा भाजी बाजार भरतो. हा बाजार नगर मनमाड रोडलगत नागपूर ते गजानन कॉलनी या दरम्यान भरत असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी जमते. दर शनिवारी होणार्‍या या अलोट गर्दीमुळे कोरोना संक्रमनात आणखीच भर पडत आहे. नागरिकांना या गंभीर आजाराची  भीती वाटत नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत असून याठिकाणी कोणाचाही धाक उरला नसल्याचे चित्र समोर येत आहे. याठिकाणी हाकेच्या आंतरावर एमआयडीसी पोलीस स्टेशन असूनही ’ना धाक ना धोका’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. महामार्गालगतच भाजी विक्रेते बसत असल्यामुळे परिसरात वाहतुकीची कोंडीही मोठ्या प्रमाणात होत आहे.
   कोरोनाचा ग्रामीण भागात शिरकाव झाल्यानंतर सुरुवातीलाच निंबळक, नागापूर, वडगाव गुप्ता येथे जास्त संख्या आढळून आली होती. अनेक गावांच्या सीमा पत्रे ठोकून बंद केल्या होत्या. याच काळात लोकांनी स्वतःहून जनता कर्फ्यू स्वीकारला. यानंतर काही दिवसांनीं बाधितांची संख्या आटोक्यातही आली. परंतु काही दिवसांपासून हा आकडा पुन्हा हळूहळू वाढत चालला असून याला नागरिकांचा बेजबाबदारपणाही कारणीभूत ठरत आहे. याबेजबाबदारपणाला प्रशासनाने वेळीच लगाम घालून कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here