“विनामास्क” कारवाई केली, म्हणून मनपा कर्मचार्‍यास मारहाण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 6, 2021

“विनामास्क” कारवाई केली, म्हणून मनपा कर्मचार्‍यास मारहाण.

 “विनामास्क” कारवाई केली, म्हणून मनपा कर्मचार्‍यास मारहाण.

353 चा गुन्हा दाखल; डॉक्टर गजाआड.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. महापालिकेने नेमलेल्या पथकामार्फत दंडात्मक कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार कामकाज करत असताना मनपाचे कर्मचारी विष्णू देशमुख यांना डॉ पुरुषोत्तम आहुजा (वय 51 रा. रासनेनगर) यांनी मारहाण केली. याबाबत तोफखाना पोलिसांनी 353 चा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
   याबाबत युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे म्हणाले, सावेडी भागात विष्णू देशमुख विनामास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करत असताना त्यांना मारहाण झाली. पोलिस उपस्थित असताना ही मारहाण झाली आहे. संबंधित कर्मचार्‍याला जोपर्यंत पोलिस संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत विनामास्क दंड वसुलीचे कामकाज बंद केले आहे. आम्ही चारही झोनचे पथक सावेडी उपकार्यालयात बैठक लावली आहे. मारहाण करणार्‍या व्यक्तीचा वैद्यकीय परवाना मनपाने रद्द करावा, या मागणीसाठी ही बैठक होत आहे. मारहाण करून काम करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आयुक्तांचे आदेश नाही, अशी माहिती लोखंडे यांनी दिली.
    याप्रकरणी कामगार युनियनने संताप व्यक्त करत, पोलिस बंदोबस्त जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत कारवाई बंद करणार असल्याची भूमिका घेतली आहे. याप्रकरणी शासकीय कामकाजात अडथळा आणल्याची तक्रार कर्मचार्‍याने पोलिसांत दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here